महाराष्ट्राने गेल्या शंभर वर्षांत अभिजात संगीताच्या क्षेत्रात इतकी भरीव अशी कामगिरी केली की, अन्य कोणत्याही प्रांताला त्याचा हेवा वाटेल. हे सारे घडले, याचे कारण महाराष्ट्रातील रसिकाने स्वत:ची जडणघडणकरण्यासाठी वैचारिक परंपरेचा आधार घेतला . याचीच दखल घेत, हा बदल आणि आपले संगीत आपल्या लोकांसमोर आणण्यासाठीच झी युवा या वाहिनीने पुढाकार घेत मागील वर्षी ” संगीत सम्राट पर्व १ ” या एक हटके पणसंगीतमय कार्यक्रमाची निर्मिती केली होती. ‘संगीत सम्राट पर्व १’ हा संगीतक्षेत्रातील न भूतो ना भविष्य असा अभूतपूर्व कार्यक्रम घडला आणि महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी त्याचा मनमुराद आनंद घेतला. महाराष्ट्रभर याकार्यक्रमाची प्रशंसा सुद्धा केली. आता पुन्हा संगीताची तीच जादू दाखवायला ‘संगीत सम्राट पर्व २’ येत आहे. ‘संगीत सम्राट पर्व १’ ने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतील उत्तम कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. तेच व्यासपीठ आणखी मोठ्या स्तरावर झी युवा महाराष्ट्रातील त्या असंख्य , संगीत क्षेत्रात स्वतःच अस्तित्व दाखवण्यासाठी एका संधीची, वाट पाहणाऱ्या कलाकारांसाठी लवकरचं घेऊन येत आहे. या वेळी सुद्धामहाराष्ट्रभर झी युवा ऑडिशन घेणार आहे. महाराष्ट्रीयन संगीताची एवढी मोठी दखल आजवर छोट्या पडद्यावर घेतली गेली नव्हती. ‘संगीत सम्राट पर्व १’ मध्ये ज्याप्रमाणे आधुनिक संगीत आणि पारंपरिक संगीत एकत्रदाखवत रसिक प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेतला आणि मंत्रमुद्ध केले त्याच प्रमाणे ‘संगीत सम्राट पर्व २’ सुद्धा स्वतःची वेगळी जादू दाखवेल आणि महाराष्टातील सर्वोत्तम टॅलेंट प्रेक्षकांपर्यंत आणेल , जे आजवर कोणीही पहिलेनसेल.
झी युवा वर संगीत सम्राट पर्व -२ लवकरचं

Leave a Reply