‘ओवी’ – रंगभूमीवरील भयकथा

IMG_7750

 

तरुणपणाच्या उंबरठ्यावर विविध विषयांची बांधणी करत अनेकदा काही सत्य वास्तव रुपात सादर करत प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकविणाऱ्या दर्जेदार एकांकिकांचे जाळे आता व्यावसायिकतेच्या दारीही घुमू लागले आहे. गेल्या अनेक वर्षामध्ये मनाला भिडणाऱ्या एकांकिकांचे विषयच नव्हे तर अगदी संपूर्ण एकांकिकाच व्यावसायिक रंगमंचावर उतरली आहे. ऑल द बेस्ट, गिरगाव व्हाया दादर, श्यामची आई आणि आता ओवी अशा बऱ्याच एकांकिका आता नाट्यरूपात व्यावसायिक रंगमंचावर उतरल्या आहेत. ओवी हि एकांकिका साठ्ये कॉलेजने सादर केलेली आणि विजेतीही ठरलेली. याच एकांकिकेचे नाटकात रुपांतर झाले आणि महेश मांजरेकर यांनी कलाकारांना व्यावसायिक व्यासपीठ दिले.

ओवी या कथेतून स्क्रिझोफेनिया या विकारावर भाष्य केले असले तरी या विकारावर मात करण्यासाठी सर्व कलाकारानी मेहनत घेतली आहे. हे नाटक खास ठरते ते नेपथ्य, संगीत आणि लाईट्स यांच्या इफेक्ट्सने. नाटकातील कलाकार हे संगीत आणि लाईट्स ला प्रतिसाद होतात. आणि भीतीची अनुभूती तेथे येते.
दुबईला पैसे कमावण्यासाठी निघालेला काका त्याच्या पुतणीला ओवीला  गावाबाहेरील एका आश्रमशाळेत घेऊन येतो. मात्र, आश्रमशाळेत जागा नसल्याचे तेथील प्रमुख समिधाताई  सांगतात.  तेथील स्थानिक आमदाराचा फोन येतो आणि त्याच्या दबावाखाली त्या ओवीला एक खोली दिली जाते. हि खोली काही महिने पोलिसांनी बंद केलेली असते. एका गूढ मृत्युच्या तपासासाठी हि खोली बंद असते. आणि ओवीला हि खोली दिली जाते. आणि सुरु होते ती गूढ, रहस्य आणि थरार घटनांची कहाणी. त्या खोलीच्या कपाटातून कुणीतरी बाहेर येते, कुणीतरी आत जाते, भिंतीवरील फोटोफ्रेम हलणे, बॉल हवेत उडणे, कपाट हलणे यासारख्या घटना घडतात. त्या खोलीतील त्या कपाटात तेथील शिपाई संपत याचा मृत्यू झालेला असतो. ओवीला हे सगळे दिसत असते कि भास ? असा प्रश्न तेथील मुलींना आणि समिधाताईला पडतो. ओवी वर उपचार करणारा डॉक्टरही हतबल होतो.  ओवीला छाया आणि पूजा दिसतात पण मुळात त्या तिथे नसतातच. मग या छाया आणि पूजा कोण? तिचा हा विकार वाढतच जातो. ओवीच्या अंगात भूत आहे का? आश्रमशाळेत भूतांचा वावर आहे का? असे प्रश्न नाटक पाहताना डोक्यात येतात.
ओवी ची भूमिका गौरी इंगावले हिने केली आहे. व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पणातच ती प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. समिधा साकारलीय हेमांगी कवी हिने. तिने या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. नुपूर दुदवडकर, मृगा बोडस, स्नेहल शिदाम आणि भाग्यश्री पाणे यांनी त्यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे. नाटकात ओवीसोबतच लक्षात राहतात त्या छाया आणि शोभा. नाटक जितक्या उत्तम प्रकारे लिहिलेय तितकेच नेपथ्य आणि संगीतही उत्तम आहे. या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे कलाकार त्यांच्या सहकलाकारसोबतच  नेपथ्य आणि संगीत यांना प्रतिसाद देतात. त्यामुळे ओवी हे नाटक वेगळे ठरते.
फाळकेज फॅक्टरी आणि अश्वमी थिएटर्स या नाट्यसंस्थे तर्फे निर्माते विनायक गवांदे आणि महेश मांजरेकर यांनी ओवी ह्या नाटकाची निर्मिती केली आहे. लेखन सचिन अनिकेत यांचे असून दिग्दर्शन अनिकेत पाटील यांचे आहे. नेपथ्य प्रशांत राणे यांचे असून प्रकाश योजना भूषण देसाई यांची आहे. संगीत अजित परब यांनी दिले
ओवी द्वारे प्रेक्षकांना रंगभूमीवर हॉरर नाट्य अनुभवता येणार आहे.
सारिका कामतेकर

One thought on “‘ओवी’ – रंगभूमीवरील भयकथा

Add yours

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: