” सायकल ” चांगुलपणाची री–सायकल,,,,
व्यक्ती तितक्या प्रकृती या प्रमाणे प्रत्येकाचे स्वभाव हे वेगवेगळे असतात, स्वभाव वेगळे असले कि आवड–निवड हे सुद्धा निरनिराळी असते, आवडी मध्ये कोणाचे मन कश्यावर बसेल हे सांगता येणे कठीण असते, कोणाला मोटार आवडते त्याचे विविध प्रकारचे मॉडेलवर प्रेम करणारी माणसे आपण आपल्या आजूबाजूला पाहतो, मोटारी, स्कूटर, बाईक, फटफटी, बुलेट अश्या अनेक प्रकारच्या वाहनावर सुद्धा अनेकांचे मनापासून प्रेम असते, त्याच प्रमाणे ” सायकल ” हि सुद्धा एक आवडीची वस्तू आहे. आपल्या सायकल ची काळजी घेणारे, तिला व्यवस्थित तेल/पाणी करीत घरात आपल्या डोळ्यासमोर कशी राहील हेच पाहणारी मंडळी असू शकतात.
कोकणातल्या लहानश्या गावात केशवराव नावाचे ज्योतिषी हे आपल्या कुटुंबासह राहत असतात, घरामध्ये त्यांचे वडील, बायको आणि शाळेत जाणारी मुलगी असा त्यांचा परिवार असतो, मुलीला शाळेतून आणणे आणि शाळेत पोहोचविण्याचे काम केशवराव आपल्या आवडत्या सायकलीवरून नियमितपणे करीत असतात, त्यांना हि सायकल त्यांच्या आजोबांनी दिलेली असते आणि त्याची नीटपणे काळजी घे असे सांगितलेले असते, तेव्हापासून केशवराव ह्या सायकलीला आपल्या जिवापलीकडे जपत असतात, कोकणात खेळे, नाटके ह्याचे प्रयोग सतत होत असतात, अश्याच एके दिवशी केशवराव आणि त्यांचे सर्व कुटुंबीय सौभद्र नाटक पहायला जातात आणि त्याचवेळी गावात मंग्या आणि गजा नावाचे भुरटे चोर शिरतात, नाटकाच्या प्रयोगात गाव रंगलेलं असते त्याचवेळी केशवराव आणि गावात चोरी होते, हि चोर मंडळी नेमकी केशवराव यांची सायकल चोरतात,
गावात चर्चा होते, केशवराव यांची सायकल चोरीला जाते आणि केशवराव यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो, मनापासून ह्या सायकलीची काळजी त्यांनी घेतलेली असल्याने त्यांना अन्नपाणी गोड लागत नाही. केशवराव हे ज्योतिषी असतात त्यांच्या कडे कुंडली घेऊन आलेल्या व्यक्तीला ते सांगतात कि“कुठल्याही गोष्ठी मध्ये गुंतून राहू नकोस ” कुंडली मध्ये आहे भाग्यात आहे ते होणारच, विधिलिखित अटळ असते, पण आता नेमके केशवराव यांच्यावरच हे संकट आलेले असते, केशवराव सायकल शोधायला बाहेर पडतात,
मंग्या आणि गजा यांनी सायकल चोरलेली असते, त्याच बरोबर इतर गोष्टी चोरलेल्या असतात, सायकल वरून जाताना सायकल पंक्चर होते आता पुढील गावात जाऊन ते पंक्चर काढायला सायकल च्या दुकानात जातात, तेथे तो दुकानदार केशवराव यांची सायकल ओळखतो, ह्या दोघांच्या कडे हि सायकल कशी आली त्याची चौकशी करतो, ते दोघे इरसाल चोर असतात ते आम्ही केशव दादा चे आतेभाऊ आहोत असे सांगतात, एकाचे नाव विठ्ठल आणि दुसरा तुकाराम असे आपले नामकरण करून टाकतात. पुढे त्या दोन्ही चोरांना चांगले अनुभव येतात कारण त्यांनी केशवराव ह्या चांगल्या माणसाची सायकल त्यांनी चोरलेली असते, ते दोघे जिथे जिथे जातात तेथे सायकल ओळखली जाते आणि त्यामुळे त्यांना चांगली वागणूक मिळते, त्यां चोरांना उपरती होते आपण चुकलो ह्याची जाणीव होते हि सायकल ज्याची आहे त्यांना परत करायची असे ते ठरवतात, आणि शेवटी केशवराव यांची सायकल त्यांना मिळते कि नाही ? मंग्या आणि गजा ह्या चोरांचे पुढे काय होते ? ते गावकरी ह्याच्या ताब्यात सापडतात का ? अश्या अनेक भावनिक प्रश्नांची उत्तरे सायकल मध्ये मिळतील .
माणसाच्या मनात चांगुलपणा हा दडलेलाच असतो ह्यावर हा सिनेमा भाष्य करतो. आपल्यात असलेला चांगुलपणा – लोकांना मदत करण्याची वृत्ती हि आपणच शोधायला हवी. आपण आपल्या आवडत्या वस्तूवर प्रेम करतो, ती जीवापाड जपतो, पण तुम्ही त्यात गुंतून जाऊ नका, ती वस्तू आपल्यापासून दूर गेली कि त्रास हा होणारच आहे, ह्याची जाणीव ठेवा असा संदेश हा सिनेमा कळत न कळत देऊन जातो.
केशवराव ची भूमिका ऋषिकेश जोशी यांनी भूमिकेतील चढ–उतार सह रंगवलेली आहे. मंग्या आणि गजा च्या भूमिकेत प्रियदर्शन जाधव आणि भालचंद्र कदम यांनी सहजतेने साकारलेली आहे. केशवराव यांच्या बायकोची भूमिका दीप्ती लेले हिने आणि मुलगी मृण्मयी ची भूमिका मैथिली पटवर्धन यांनी सादर केली आहे,एकंदरीत सायकल हा चांगुलपणावर भाष्य करणारा सिनेमा असून त्याला जायचे कि नाही हे प्रेक्षकच ठरवतील.
अशी मध्यवर्ती कल्पना घेऊन वायकॉम १८ मोशन पिक्चर्स यांची प्रस्तुती असून एम एफ ए आणि थिंक व्हाय नॉट यांच्या सहयोगाने हैपी माइंड एन्टरटेन मेंट यांच्या तर्फे ” सायकल ” ह्या चित्रपटाची निर्मिती केली असून,निर्माते अमर पंडित आणि संग्राम सुर्वे हे आहेत,, चित्रपटाची कथा आदिती मोघे यांची असून दिग्दर्शन प्रकाश कुंटे यांनी केलेले आहे, ह्या मध्ये ऋषिकेश जोशी,प्रियदर्शन जाधव, भालचंद्र कदम, दीप्ती लेले, मैथिली पटवर्धन यांच्या भूमिका आहेत. ह्या सायकल ची कथा हि कोकणातल्या एका गावात घडते, स्वातंत्र्यपूर्व काळात हि कथा घडते, कोकणातील निसर्ग सौंदर्य, समुद्र–डोंगर, फळझाडे–बागा,वगैरेचे रम्य दर्शन छायाचित्रण उत्तम केले आहे.
Leave a Reply