आलिया भटच्या उत्कृष्ट भूमिकेमुळे चर्चेत असलेल्या ‘राझी’नं प्रेक्षकांची पसंती मिळवत बॉक्सऑफिसवर बाजी मारली आहे. वीकेंडला सुमारे ३३ कोटी रुपये कमाई केलेल्या या सिनेमाच्या कमाईचे आकडे पाच दिवसांतच ४५ कोटींच्या पुढे पोहोचले आहेत. या महिलाकेंद्रीत सिनेमाची वाटचाल आता वेगानं १०० कोटी क्लबच्या दिशेनं होऊ लागली आहे.
‘राझी’ची कमाई (कोटींमध्ये)
पहिला दिवस: ७.५३
दुसरा दिवस: ११.३०
तिसरा दिवस: १४.११
चौथा दिवस: ६.३०
पाचवा दिवस: ६.१०
Leave a Reply