मंकी बात – लहानपण देगा देवा

vlcsnap-2018-04-18-11h31m54s024लहानपण देगा देवा,,, लहानपण – बालपण म्हणजे मौज धमाल आणि हसत खेळत शिक्षण ह्याचा अनुभव प्रत्येकानी घेतलेला असतोबालपणी मुलांच्यात दंगा करण्याची खूप ऊर्जा असते त्या उर्जेला चांगली दिशा दाखवली तर त्याला आपले ध्येय नक्कीच गाठता येऊ शकतेहे संस्कार लहानपणीच आपल्यावर आई – बाबा – शिक्षक आणि आपली नातेवाईक मंडळी करीत असतातलहानपणी खूप दंगा केला तर त्याची शिक्षा हि मिळतेच त्यातून मुलांनी आपल्या स्वभावात सुधारणा करायची असतेपण लहान मुले दंगामस्ती प्रमाणाबाहेर का करतात त्याची एक मानसिकता जाणून घ्यायला पाहिजे,,, अश्याच लहान मुलांचा विषय घेऊन चित्रपट निर्माते विवेक डीरश्मी करंबेळकरमंदार टिल्लूविजू माने यांनी मंकी बात ची निर्मिती केली आहे चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आकाश पेंढारकरविनोद सातवअभय ठाकूरप्रसाद चव्हाण शंकर कोंडे हे असून हि प्रो ऍक्टिव्ह ची प्रस्तुती असून निष्ठा प्रोडक्शन ची निर्मिती आहेकथा लेखन विजू मानेपटकथा विजू मानेमहेंद्र कदमसंवाद आणि गीते संदीप खरेछायाचित्रण क्रिष्णा सोरेनसंकलन सतीश पाटीलसंगीत डॉ सलील कुलकर्णीयांचे लाभले असून ह्या मध्ये वेदांत आपटेपुष्कर क्षोत्रीभार्गवी चिरमुलेअवधूत गुप्तेनितीन बोर्डेमंगेश देसाई नयन जाधवविजय कदमराधा सागरसमीर खांडेकर ह्या कलाकारांनी आपापल्या भूमिकेला न्याय दिलेला आहे.

वायू नावाच्या शाळेत जाणाऱ्या लहान मुलाची कथा ह्या सिनेमात मांडली आहेवायू आणि त्याचे बाबा श्रीकांत आणि आई अंजली हे सारे कोल्हापूर ला राहत असतातवायू शाळेमध्ये हुशार मुलगा म्हणून सर्वाना माहित असतो वायू उत्तम फुटबॉल खेळतो आणि त्याने शाळेला फुटबॉल ची ट्रॉफी जिंकून दिलेली असतेती ट्रॉफी घेऊन तो घरी आईबाबांना दाखवतो त्यावेळी त्याचे बाबा त्याला सांगतात कि आपण आता मुंबईला जाणार आहोत कारण माझी बदली मुंबई ला झालेली आहेवायू ला खूप दुःख होतं कारण त्याच्या मित्र परिवाराला सोडून तो मुंबईला जाणार असतो.

मुंबई मध्ये ते एका मोठया सोसायटी मध्ये राहायला जातातसोसायटी खूप मोठी असल्याने तेथे खेळायला जागा खूप असते पण सोसायटी मधील मुले वायू ला खेळायला घेत नाहीतते त्याची टिंगल टवाळी करतातमुले आणि वायू या दोघांच्या मध्ये श्रीकांत अर्थात वायू चे बाबा मध्यस्थी करतात आणि वायू त्यांच्यात खेळायला सुरवात करतो त्यावेळी मुलांच्या हातून एका खिडकीची काच फुटते आणि नाव मात्र वायू चे घेतले जातेसगळ्यांचा राग वायू ला सहन करावा लागतोत्याचवेळी वायू ठरवतो कि आता आपण चांगलं वागून काही उपयोग नाही आपल्याला आता त्या मुलांना दंगामस्ती करून धडा शिकवायला पाहिजे,आणि वायू दंगामस्ती करून सोसायटी मधील मुलांना त्रास द्यायला सुरवात करतोशाळेतील मुलांना तो छळतोत्याच्या आई कडे तक्रार केली जातेतरी वायू ची दंगामस्ती थांबत नाही,

एक दिवस तो असाच त्रास देत असताना कृष्णा नावाचा माणूस विविध रूपाने येऊन वायू ला दंगा करू नकोस असे समजावतोपण वायू त्याचे काही ऐकत नाहीशेवटी कृष्णा वायू ला सांगतो कि आता तुझे शंभर अपराध पुनः झाले कि तुझे रूप माकडात होईल ह्यावर वायू विश्वास ठेवत नाही आणि तो एक अपराध करतो आणि वायू चे रूप माकडा मध्ये होऊन जाते.

वायू चे रूपांतर माकडात होते त्यावेळी त्याला आपली चूक करून येतेवायू ने केलेल्या दंगामस्ती ची शिक्षा त्याला मिळतेसोसायटी मध्ये माकड आले म्हणून सोसायटीमध्ये गोंधळ उडून जातोत्या नंतर सोसायटी मधील लोक माकड पकडणाऱ्या व्यक्तीला घेऊन येतातआणि मग पुढे नक्की काय होते ते तुम्ही सिनेमा पाहून ठरवावायू ला त्याच्या शिक्षेचे काय वाटते त्याला पुन्हा कृष्णा भेटतो का वायू मध्ये बदल होतो कि नाही वायू ला आणखी कोणते दिव्य करावे लागते अश्या अनेक प्रश्नांची उत्तररे ह्या सिनेमात सापडतील त्यासाठी तुम्ही सिनेमा पाहावायामधील वायू ची भूमिका वेदांत आपटे यांनी केलेली असून त्याने भूमिकेमधील अनेक बारकावे उत्तमपणे सादर केले आहेतश्रीकांत अर्थात वायू चे बाबा ची भूमिका पुष्कर क्षोत्री यांनी आणि अंजली वायू ची आई ची भूमिका भार्गवी चिरमुले हिने छान रंगवली आहेकृष्णांच्या भूमिकेत अवधूत गुप्ते छान दिसले असून त्यांनी भूमिका मस्तपैकी खुलवली आहे… ह्या शिवाय विजय कदममंगेश देसाईनयन जाधवसमीर खांडेकरनितीन बोर्डेराधा सागर यांनी आपल्या भूमिका चोखपणे सादर केल्या अहितचित्रपटाचे संगीत हि एक बाजू ठीक आहे,

एकंदरीत एक दंगलमस्त – गमतीदार घटनांनी भरलेला हा सिनेमा आहेहसत खेळत हा सिनेमा लहानमुलांना एक छान संदेश देऊन जातोसंदेश काय तो सिनेमात कळेलबालगोपाल मंडळी ना सिनेमा पसंत पडायला हरकत नसावी,,,,

दीनानाथ घारपुरे

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

<span>%d</span> bloggers like this: