‘रेडू ‘ – भावनिक, हृदयस्पर्शी रेडू

‘हे आकाशवाणीचे मुंबई केंद्र आहे’ हे वाक्य कानावर पडले की सगळेच आपापली कामे बाजूला  सारून फक्त नी फक्त रेडीओ ऐकत बसयाचे. साधारणपणे, मुंबईत १९७० च्या दशकात रेडीओ आला आणि मग मुंबई सोबत महाराष्ट्रातही त्या रेडीओला ऐकण्याची आवड सर्वामध्ये निर्माण झाली. आणि हा रेडिओ आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक कसा बनला याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘रेडू’ सिनेमा.  एखादी वस्तू आवडली किंवा त्या वस्तूवर एका कोणाचे मन जडले ती त्या वस्तूला ते मन आपलेसे करून टाकते, त्या वस्तू शिवाय त्याला काहीच सुचत नाही आणि अश्या एका मनाच्या माणुसकीवर आधारित एक कथा कोकणच्या पार्श्वभूमीवर ” रेडू ” नावाच्या वेगळा विषय असलेल्या सिनेमात मांडली आहे.

तातू आणि छाया हे कोकणातील एका गावात रहाणारे जोडपे, त्यांना सरू नावाची एक मुलगी, हे दोघे गावातील एका प्रतिष्ठित माणसाच्या शेतात विहीर खणण्याच्या कामावर जात असतात, आणि त्यामध्ये ते दोघे सुखी असतात. तातू हा साधा सरळ माणूस असला तरी काहीसा तो चिडखोर आहे.   त्याची बायको छाया त्याला सांभाळून घेत असते, ते एक दिवस कामावर निघालेले असताना नावेच्या प्रवासात अचानक तातू ला गाण्याचे सूर ऐकू येऊ लागतात, समोरच्या नावेमध्ये एका माणसाकडे रेडू अर्थात रेडिओ ट्रॅजिस्टर असलेला दिसतो,

तातूला तो रेडिओ आवडतो, आणि त्याला तसाच एक रेडिओ आणण्याची इच्छा होते, त्यांच्या मनात रेडिओ ने घर केलेलं असते, तातू ला ध्यानी-मनी सतत रेडिओ दिसत असतो. एक दिवस त्यांच्या घरी छायाची पळून गेलेली बहीण सुमन आपल्या नवऱ्या बरोबर येते, तातूला ती दोघे आलेलं आवडत नाही, तो तुसडेपणाने वागतो, पण ज्यावेळी त्यांचा साडू बबन हा पिशवीतून रेडिओ बाहेर काढून ऐकायला लागतो त्यावेळी तातू चे मन सुधारू लागते, त्यांना रेडिओ घ्यायचा असतो ते रेडिओ कडे न्याहाळून- कुतूहलाने – कौतुकाने बघतात. अर्थात त्यानंतर बबन चे स्वागत छान होते. बबन आणि सुमन घरी जायला निघतात त्यादिवशी बबन त्यांना तो रेडिओ भेट म्हणून देतो. लहान मुलाला त्याची आवडीची गोष्ट दिसली आणि ती मिळाली कि जसा आनंद होतो तसाच आनंद तातू यांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर दिसू लागतो. तातू चा गावात रुबाब वाढतो.  तातू रेडिओ ची काळजी मनापासून घेत असतात त्याचवेळी त्यांचा भाचा सुदामा येतो आणि तो त्या रेडिओची चोरी करून पळून जातो, तातू ला समजते कि रेडिओ चोरीला गेलाय आणि सुदामा सुद्धा घरी नाही त्यामुळे ते सुदामाच्या शोधात गावोगावी असलेल्या त्यांच्या नातेवाईकांकडे जातात.

रेडीओ सापडतो कि नाही?  तातू ना त्यांचा आनंद कसा आणि कोणत्या मार्गाने मिळतो ? अश्या अनेक भावनिक प्रश्नांची उत्तरे रेडू मध्ये मिळतील. रेडीओसाठी असणारी तातूची तळमळ यात दाखवली आहे.

मालवणी तातू ची भूमिका शशांक शेंडे यांनी उत्तम रंगवलेली आहे. आनंदाचे / दुःखाचे विविध क्षण त्यांनी अप्रतिम सादर केले आहेत. त्यांनी ह्या सिनेमासाठी मालवणी भाषा शिकून घेतली. छाया कदम यांनी छाया ची भूमिका त्या व्यक्तिरेखांच्या अनेक भावछटा छानपणे व्यक्त केलेल्या आहेत. नवऱ्यावर आणि कुटुंबावर असलेलं प्रेम त्यांनी छान सादर केलं आहे. शशांक शेंडे आणि छाया कदम हे दोघे लक्षांत रहातात, त्याना साथ गौरी कोंगे { सुमन } विनम्र भाबळ { बबन}, मृण्मयी सुपल { सरू } या कलाकारांनी दिली असून त्यांनी आपापल्या भूमिकेला योग्य तो न्याय दिलेला आहे. सिनेमाचे संगीत छान आहे,  कथा – पटकथा – संवाद संजय नवगिरे यांचे असून कार्यकारी निर्माते नेहा गुप्ता, रुपेश जाधव हे आहेत. हि कथा कोकणच्या पार्श्वभूमीवर असल्याने दिगदर्शक सागर छाया वंजारी यांनी त्यात मालवणी भाषेचा गोडवा आणलेला आहे. सागरचा हा पहिला सिनेमाच मनाला चटका लावणारा आहे. redu.JPGकथेचे मालवणी रूपांतर चिन्मय पाटणकर यांचे असून संगीताची बाजू विजय गवंडे यांनी सांभाळलेली आहे. या मध्ये शशांक शेंडे, छाया कदम, गौरी कोंगे, विनम्र भाबळ,  मृण्मयी सुपल असे कलाकार असून त्यांनी ह्यामध्ये मालवणी भाषेचा गोडवा जपला आहे.

सारिका कामतेकर

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: