असा आहे सनीच्या ‘वीरमादेवी’चा फर्स्ट लूक!

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री म्हणून कायमच सनी लिओनीकडे पाहिलं गेलं आहे. आपल्या मादक अदांमुळे सतत चर्चेत राहिलेल्या सनीने आतापर्यंत आपल्या नृत्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. बॉलिवूडमध्ये प्रमुख भूमिकांपासून सुरुवात करणा-या सनीने कालांतराने आपला कल आयटम सॉगकडे वळविला होता. त्यानंतर तिच्या नावावर चित्रपटातील प्रमुख भूमिका कमी आणि आयटम सॉग अधिक झाली होती. मात्र आपल्यावरील ‘आयटम गर्ल’ हा टॅग पुसण्याचा निर्णय सनीने घेतल्याचे दिसून येत आहे. सनीला एका दाक्षिणात्य चित्रपटामध्ये भूमिका करण्याची संधी मिळाली असून या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे.

आयटम सॉग केल्यानंतर सनी ‘वीरमादेवी’ या दाक्षिणात्य चित्रपटामध्ये एका योद्ध्याच्या भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला असून या फर्स्ट लूकमध्ये केवळ सनीचे डोळे आणि कपाळावरील टिकली दिसून येत आहे. या चित्रपटाचे पोस्टर सनीने ट्विटरवर शेअर केले असून ती चित्रपटाच्या रिलीजसाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे.veermadevi

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: