चला हवा येऊ द्या’ च्या रंगमंचावर आजपर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांनी उपस्थिती लावली. आमिर, शाहरुख, सलमान नंतर प्रतीक्षा होती ती बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी मराठमोळी ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितची. माधुरी ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर आली तो आपला पहिला वाहिला मराठी चित्रपट ‘बकेट लिस्ट’ घेऊन.
यावेळी ‘चला हवा येऊ द्या’ टीम ने ‘हम आपके हैं कौन’ वर स्किट करून धमाल उडवून दिली. या कार्यक्रमासाठी करण जोहर हा देखील उपस्थित होता. ‘बकेट लिस्ट’ टीमसोबत माधुरीने आपला वाढदिवस साजरा केला.
Leave a Reply