आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोणाला मिळणार गुलाबाचा मान ? तर कोणाला मिळणार काट्यांचा मान ? यामध्ये स्मिताने उषाजींना गुलाबाचे फुल दिले, उषाजींनी स्मिताची बरीच तारीफ देखील केली, तर राजेशला काटे म्हणजे निवडुंगाचे झाड दिले त्याचे कारण प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये कळेलच … उषाजींनी मेघाला ती खूप बोलते म्हणून प्रेमाने काट्यांचा मान दिला, तर त्यांच्या लाडक्या पुष्करला मिळाला फुलांचा मान. तर भूषणने सुशांतला तर हर्षदाने रेशमला फुलाचा मान दिला. रेशमने आणि भूषणने मेघाला काट्यांचा मान दिला.
तसेच या WEEKEND चा डाव मध्ये प्रेक्षकांशी बो
लण्याची संधी घरातील सदस्यांना मिळाली. ज्यामध्ये रेशम आणि सईला प्रेक्षकांनी प्रश्न विचारले. रेशमला एक प्रश्न विचारला कि,तुमची कॉम्पीटीशन या खेळामध्ये कोण आहे ? ज्यावर रेशमने म्हंटले माझी या खेळामध्ये कोणच कॉम्पीटीशन नाही, आणि हा खेळ मी जिंकणार आणि तो कॉन्फिडन्स मी घरूनच घेऊन आले आहे. सईला देखील चाहत्याने खूप मजेदार प्रश्न विचारला कि, तुम्ही तुमची कामे पुष्करला का सांगता ? ज्यावर सईने खूपच गोड उत्तर दिले ती म्हणाली मी माझं काम आता करेन …
या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाणार ? कोणाला मिळणार विशेष अधिकार ? येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होणार ? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवणार ? आणि पुढील आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाणार ? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी सोम ते शनि रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.
Leave a Reply