‘पिंक’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कौशल्याची छाप सोडणारी अभिनेत्री तापसी पन्नू आगामी ‘मुल्क’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला असून यामध्ये तापसी पुन्हा एकदा कोर्टात पाहायला मिळत आहे. मात्र यावेळी ती आरोपीच्या कठड्यात नसून वकीलाच्या वेशात आहे. तापसीने सोशल मीडियावर हा फर्स्ट लूक पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ऋषी कपूरसुद्धा आहेत.
‘एक बार फिर अदालत होगी, कटघरा होगा, एक परिवार होगा, एक मानसिकता होगी और विरोध होगा,’ असं कॅप्शन देत तिने चित्रपटातील तिच्या भूमिकेचं नाव आरती असल्याचंही लिहिलं. २७ जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुभव सिन्हा करत आहे.
Leave a Reply