ज्या घरात अभिनेते अशोक कुमार, प्रसिद्ध पार्श्वगायक किशोर कुमार आणि अनुप कुमार यांनी आपलं बालपण घालवलं… ज्या घरात किशोरदाची गायकी बहरली… ते घर अखेरीस विकण्यात आलं आहे. मध्यप्रदेशातील खंडवा येथे असलेलं किशोरकुमार यांचं हे वडिलोपार्जित घर साडे चौदा कोटी रुपयांना विकण्यात आलं आहे.
किशोरदांचं हे घर खंडवातील मुख्य बाजारपेठेत आहे. दहा हजार स्क्वेअर फुटाच्या फ्लॅटवर हे घर आहे. घराच्या समोर अनेक दुकाने उघडण्यात आली असून घराच्या गेटवर ‘गांगुली हाऊस’ असं लिहिलं आहे. किशोरदांचे वडील भोपाळमधील मोठे वकील होते. किशोरदा, अशोक कुमार आणि अनुप कुमार यांचा याच घरात जन्म झाला. याच घरात राहुन त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर अभिनयात नशीब अजमवण्यासाठी किशोरदा मुंबईत आले होते. 

Leave a Reply