संगीतमय राजा लवकरच चित्रपटगृहात

 आयुष्यात प्रत्येकजण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी धडपडत असतो.  वाटेत येणाऱ्या अडीअडचणींना पार करीत यशापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत असतो. याच धडपडीची कथा दाखवताना प्रेमाची गोष्ट उलगडणारा राजा हा संगीतमय चित्रपट २५ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘सत्यसाई मल्टीमिडीया प्रा.लि’ चे निर्माते प्रवीण काकड यांनी या चित्रपटाची निर्मीती केली असून दिग्दर्शन शशिकांत देशपांडे यांचे आहे.

या चित्रपटाची कथा राजाच्या आयुष्यातील अनेक चढ–उतारांभोवती फिरते. नैसर्गिक आवाजाची सुरेल देणगी लाभलेल्या एका शेतकऱ्याच्या मुलाचा पॉप सिंगर बनण्याचा प्रवास या सिनेमात आहे. देशपांडे यांनी त्रिकोणी प्रेमकथेच्या माध्यमातून राजाची कथा सादर केली आहे. सुपरस्टार बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक ब-या वाईट प्रसंगांना सामोरं जाणाऱ्या राजाला कोणाची साथ मिळते? व या साथीने त्याचे स्वप्न पूर्ण होणार की त्याला वेगळीच कलाटणी मिळणार? हे पाहणं प्रेक्षकांसाठी रंजक असणार आहे. राजाच्या संगीतमय प्रवासाची कथा हा चित्रपट मांडतो. या चित्रपटाचे संगीत विविध संगीत शैलींचा अनोखा अनुभव  देणारा असणार आहे. वलय मुळगुंदमिलिंद इनामदारकेदार नायगावकर यांच्या लेखणीने सजलेल्या गीतांना पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केलं आहे. raja.JPG

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.