राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये राधा आणि प्रेम यांच्या मध्ये सगळेच सुरळीत चालू होते. राधाने प्रेमचा व्यवसाय चालविण्यास मदत करणे, त्याच्यासोबत ऑफिसला जाणे, राधाचा प्रेमला पुरेपूर आधार मिळत होता. प्रेमने राधाच्या पाठिंब्याने त्याच्या आयुष्यातले खूप मोठे सत्य देखील पचवले होते कि तो माधुरीचा मुलगा नसून त्याला दत्तक घेतले होते. राधाने खूप आव्हांनाना पार करत मोठ्या जिद्दीने स्वत:चा संसार सांभाळला होता. प्रेमच्या मनामध्ये देखील तिने स्वत:ची हक्काची अशी जागा राधाने बनवली होती. परंतु हे सगळे मात्र दिपीकाची आई देवयानी हिला रुचले नव्हते. तिने राधा आणि प्रेमच्या विरोधात खूप मोठे कारस्थान रचले आणि त्यामध्ये ती यशस्वी देखील झाली. देवयानीने राधाच्या भोळ्या स्वभावाला लक्षात घेऊन तिला विषप्राशन करण्यास मजबूर केले. आणि प्रेमच्या प्रेमाखातर हे करण्यास राधा तयार देखील झाली. राधा आता प्रेमच्या आयुष्यात नाही म्हणजेच आपल्या आयुष्यात नाही याची कल्पना देखील प्रेमला नाहीये. प्रेमला हे सत्य कळाले तर ? प्रेमसमोर देवयानीचा खरा चेहरा आला तर ? दीपिकाचे आयुष्य सावरण्यासाठी देवयानीने राधाला मारून टाकले हे सत्य आता फक्त आदित्यला कळाले असून, आता पुढे मालिकेमध्ये काय होणार ?हे जाणून घेणे खूपच रंजक असणार आहे.
‘राधा प्रेम रंगी रंगली’ मध्ये नवे वळण

Leave a Reply