स्नॉवेलचा मुंबई मध्ये ऑडिओ-शो प्रीमियर! भारतात पहिल्यांदाच!

ऑडिओ बुक्स आणि श्राव्य माध्यमात आपला वेगळा ठसा उमटवणारे स्नॉवेल आता आपल्यापुढे “ती​ ​परत येईल ?” ह्या रोमांचक गूढ गोष्टीसह एका नाविन्यपूर्ण पद्धतीने येत आहे! डॉ. गिरीश ओक यांच्या आवाजात, शिरीष देखणे यांचीही कथा अंजली कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केली ​​आहे.

​ध्वनी या माध्यमात विलक्षण ताकद आहे. आजकाल लोकांना नुसतं ध्वनी माध्यमातून खिळवून ठेवणं आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणं निश्चितच एक आव्हान आहे. स्नॉवेल सातत्याने या क्षेत्रात नवीन मैलाचे दगड उभे करत आले आहेत. ​

स्नॉवेलने, भारतात कदाचित सर्वप्रथम, थिएटरमध्ये ‘ऑडिओ -शो’ चा प्रीमियर योजून एका आगळ्या वेगळ्या ‘प्रयोगाचा’ पायंडाच पाडला आहे! पुण्यातील यशस्वी प्रतिसादानंतर मुंबईत हा प्रयोग होणार आहे. थिएटर सारख्या वातावरणात डोळे बंद करून साउंड इफेक्टसह गोष्ट अनुभवण्याची संधी रसिक श्रोत्यांना एक विलक्षण अनुभव देणारी असेल याची खात्री आहे. ​

facebook-_ti-parat-yeil.jpg ही कथा खास श्राव्य माध्यमासाठी लिहिली आहे. दुसऱ्या महायुद्धातल्या पार्श्वभूमीवरची ही गोष्ट अनपेक्षित वळणं घेत प्रत्येक मिनिटागणिक उत्कंठावर्धक बनते आणि आपल्याला खिळवून ठेवते.
हा ‘ऑडिओ -शो’निवार २६ मे २०१८ संध्याकाळी ७.३० वाजता दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृह येथे होणार आहे. हा ऑडिओ-शो सर्वांसाठी खुला आहे

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: