बिग बॉसच्या घरात कोण मारेल बाजी ?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल रंगला मर्डर मिस्ट्री हा टास्क. ज्यामध्ये आस्ताद आणि मेघा पाच खून करण्यामध्ये यशस्वी ठरले. तसेच काल रात्री बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मेघाचा वाढदिवस साजरा केला. ज्यामध्ये रेशम, सुशांत, जुई सगळ्यांनीच तिला केक भरवला आणि शुभेच्छा दिल्या. सई आणि तिच्यामध्ये झालेली कट्टी फु देखील संपल्याचे दिसून आले. या दरम्यान मेघाने बिग बॉसकडे एक इच्छा व्यक्त केली होती. ज्यामध्ये तिने म्हंटले होते कि, तिला मर्डर मिस्ट्री या टास्क मध्ये खुन्याची भूमिका करण्यास आवडेल. बिग बॉस यांनी मेघाची ही इच्छा वाढदिवस असल्याने कबूल देखील केली. त्यामुळे टास्कमध्ये आस्ताद बरोबर मेघाला देखील खुनी बनण्याची संधी मिळाली. आज वेळ आहे सुशांत आणि स्मिता जे या टास्क मध्ये गुप्तहेर आहेत ते बिग बॉस यांना पुराव्यानिशी कोण खुनी आहे हे सांगण्याची. तेंव्हा हा खटला बघणे रंजक असणार आहे.
big boss.png
स्मिता आणि सुशांत हे त्यांच्याजवळ असलेल्या पुराव्यानुसार आस्ताद आणि मेघाला प्रश्न विचारणार आहेत. कारण, गुप्तहेरांना पुरावे सापडले आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. पण प्रश्न असा आहे का, ते दोघे मेघा आणि आस्तादवर लागलेल्या आरोपांना सिद्ध करू शकतील का ? सुशांत आणि स्मिता त्याचे म्हणणे बिग बॉस समोर आज मांडणार असून आता बिग बॉसचा निर्णय काय असेल हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. या टास्कमध्ये स्मिता किंवा सुशांत कोण मारणार बाजी ? कोणाला मिळणार संधी बिग बॉस मराठीच्या घराच्या कॅप्टनशिपसाठी उमेदवार म्हणून उभे रहाण्याची ? याची उत्तर आज मिळणार आहेत. तसेच आज बिग बॉस मराठीच्या सदस्यांना प्रश्न पडला आहे कि, SR म्हणजे कोण आहे ? कारण बिग बॉस यांनी काही सामान पाठवले आहे आणि त्यावर SR असे लिहिलेले आहे. त्यामुळे घरातील सदस्यांना हा प्रश पडला आहे कि, कोणी गेस्ट म्हणून घरामध्ये येणार आहे का ? तेंव्हा आज प्रेक्षक आणि सदस्यांना कळेलच कोण आहे ही गेस्ट व्यक्ती ?

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.