युथफुल यंग्राड

फँटम फिल्म्स, फ्युचरवर्क्स मिडिया आणि विठ्ठल पाटील प्रॉडक्शन्स या संस्था एकत्रित आल्या असून त्या यंग्राड या मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहेत. चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात ६ जुलै २०१८ रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मकरंद माने यांनी केले असून त्यात चैतन्य देवरे, सौरभ पडवी, शिव वाघ आणि जीवन कराळकर या चार युवकांच्या मध्यवर्ती भूमिका आहेत.

 यंग्राड’ हा बोलीभाषेतील प्रचलित शब्द असून तो भारताची दक्षिण काशी (दक्षिण बनारस) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये उनाड मुलांसाठी वापरला जातो. एखाद्याबरोबर भांडण उकरून काढणे किंवा मित्राला त्याच्या स्वप्नपरीबरोबर सुत जुळवायला मदत करणे यासाठी हे चारही मित्र नेहमीच एकमेकांच्या मदतीला धावून येत असतात. पण या संस्कारक्षम वयात चुकीचे आयडॉल समोर असल्याने हे चार युवक नेहमीच अडचणीत सापडतात. त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर होतो आणि आपल्याला आयुष्याची सर्व माहिती आहे, अशा आविर्भावात वावरणारे हे चौघे एका क्षणी अशा निष्कर्षाला येतात की त्यांचे आयुष्याचच विस्मरणात गेल्यासारखे होते. त्यानंतर मग ते स्वत्वाचा शोध घेऊ लागतात आणि आयुष्याच्या नवीन प्रवासाला लागतात.

 Youngraad Poster 1 Launch.jpgयंग्राड’ ही कुमारवयातील चौघांची कथा आहे. ही कथा त्या सहज परिणाम होईल अशा वयातील मैत्री, निष्पापपणा, प्रेम, कुटुंब आणि मुल्ये यांचे महत्व अधोरेखित करते. या कथेतून प्रेक्षकांना स्वतःच्या व इतरांच्या आयुष्यात काही धडे घेण्याची व त्याप्रमाणे निर्णय घेण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे ते कोणत्या कुटुंबातून किंवा पार्श्वभूमी घेऊन येतात, त्यांचे वय काय आहे याचा कोणताही परिणाम त्यावर होत नाही. आपली एखाद्या गोष्टीत चूक नसते, पण आपण ती सुधारण्यासाठी काय करतो त्यातून आपली ओळख बनत जाते, ही बाव कथेतून अधोरेखित होते,” असे उद्गार निर्माता विठ्ठल पाटील यांनी काढले आहेत.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.