कॉलेज पूर्ण करता करता एकांकिका करायची आणि कॉलेज पूर्ण झाल्यावर एकांकिका कुठे करायची? असा प्रश्न त्यावेळेस त्यांच्या मनात आला आणि या प्रश्नाचे उत्तरही त्यांनी शोधले आणि त्यातूनच दहा वर्षांपूर्वी ‘नाटक कंपनी’ चा जन्म झाला. अमेय वाघ, निपुण धर्माधिकारी, पर्ण पेठे, अलोक राजवाडे, सुव्रत जोशी यासोबतच इतर कलाकार या घरात एकत्र आले. या सर्वांनी मिळून दरवर्षी किमान १ तरी प्रायोगिक नाटक करायचे असे ठरवले आणि आजतागायत यांनी १० हून अधिक नाटके रंगभूमीवर आणलीत. त्यांच्या या नाटक कंपनीला १० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने पुण्यातील ‘नाटक कंपनी’ जूनच्या पहिल्या आठवड्यात त्यांचा ‘नाटक कंपनी फेस्टिवल’ घेऊन येत आहे.
हा ‘नाटक कंपनी फेस्टिवल’ जूनच्या १ व २ तारखेला मुंबईतील माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर येथे होणार आहे. तर ५ ते ९ जून रोजी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे होणार आहे. या फेस्टिवलमध्ये एकूण १० नाटके सादर होणार आहेत. मुंबईतील यशवंत नाट्य मंदिर येथे २ दिवसात ५ नाटके सादर होणार आहेत.
यानिमित्त, रसिक प्रेक्षकांना नवे विषय, नवे विचार, आवडत्या कलाकाराचा रंगमंचावरील अभिनय अशा परिपूर्ण नाट्यकृतीचा आस्वाद घेता येणार आहे.
फेस्टिवल चे वेळापत्रक
यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा
१ जून | सायंकाळी ६ | मी…. गालिब |
रात्री ९ | गेली एकवीस वर्ष | |
२ जून | दुपार १ | महानिर्वाण |
दुपार ४.३० | आयटम | |
रात्री ८.३० | २ शूर आणि दळण |
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड
५ जून | रात्री ८ | २ शूर |
रात्री ९.३० | महानिर्वाण | |
६ जून | रात्री ८ | पेशंट |
रात्री ९.३० | बिनकामाचे संवाद | |
७ जून | रात्री ८ | इन्स्टिट्यूट ऑफ पावतोलोजी |
रात्री ९.३० | गेली २१ वर्ष | |
८ जून | रात्री ८ | आयटम |
रात्री १०.३० | दळण | |
९ जून | दुपार ५ | सिंधू सुधाकर रम आणि इतर |
रात्री ८.३० | मी… गालिब |
Leave a Reply