छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी बांधलेल्या अनेक किल्यापैकी अत्यंत मजबूत असा ” पन्हाळा किल्ला ” या किल्ल्यावरून कोकण–गोवा–कर्नाटक–महाराष्ट्र यांच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवायला मिळत असे, शिवाजी महाराजांनी केलेल्या ऐतिहासिक अफजलखान च्या वधानंतर अवघ्या अठरा दिवसात पन्हाळा स्वराज्यात दाखल झाला होता, पण पुढे सिद्धी जोहरच्या स्वारीच्या वेळी तो विजापूरकरांना परत करावा लागला होता ,, तेंव्हापासून १३ वर्षे पन्हाळा स्वराज्यात नव्हता… आता राज्याभिषेक जवळ आल्याने आणि पन्हाळा प्रांतात विजापूरकरांचा जुलूम वाढल्याने पन्हाळा जिंकणे महाराजांच्यासाठी महत्वाचे होते. पन्हाळा किल्ला घेण्याचे शिवाजी महाराजांचे स्वप्न होत पन्हाळा किल्ला हा कोंडाजी फर्जंद यांनी फक्त साठ निवडक मावळे घेऊन साडेतीन तासात किल्ला ताब्यात घेतला, कोंडाजी फर्जंद ची वीर गाथा सांगणारा चित्रपट ” फर्जंद ” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
लेखक / दिगदर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या बरोबर बातचीत केली त्यावेळी त्यांनी सांगितले महाराष्ट्राला इतिहासाची फार मोठी परंपरा आहे. शिवरायांची प्रत्येक मोहीम हि योजनाबद्ध राहिलेली आहे. पन्हाळा किल्याच्या परिसरात मोगल सरदारांनी खूप धुमाकूळ घातला होता आणि त्याचा बंदोबस्त महाराजांना करायचा होता. पन्हाळा जिंकण्यासाठी सुरनीस अनाजीपंतांना मोहीम करण्यास सांगण्यात आले होते पण अनाजीपंतांनी जेंव्हा पाहणी केली त्यांना आढळले कि किल्याचा घेर आणि वरची शिबंदी खूप आहे. यामुळे आपल्याला हा किल्ला जिंकणे अवधड होणार आहे. असे त्यांनी महाराजांना कळवले.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी पुन्हा एकदा पन्हाळा घ्यावा असे सुचवले, आता पन्हाळा कोण घेणार असा प्रस्ताव त्यांनी ठेवला त्यावेळी ” कोंडाजी ” नि हा ” पन्हाळा ” घेण्याचा विडा उचलला, आणि तीनशे मावळ्यांच्या सह तो राजापूरला अनाजीपंत यांच्याकडे निघाला, कोकणच्या मार्गाने हल्ला करून केला घेऊ असा विचार त्यांनी त्यावेळी केला होता, पण आदल्यादिवशी त्यांनी विचार बदलला, त्यांनी एक योजना आखली आणि फक्त साठ निवडक मावळे घेऊन जायचे असे ठरवले, अमावास्येच्या दोन दिवस आधी तो पन्हाळा जवळ पोहोचला, रात्रीच्या वेळी सर्व मावळे भराभर पन्हाळा कडा चढून किल्यावर पोहोचले, कोंडाजी फर्जंद यांनी मानसशास्त्राचा विचार करून गनिमी काव्याने किल्ला घ्यायचे ठरवले होते. किल्यावर चढून आलेल्या प्रत्येक मावळ्यांच्याकडे कर्णे / रणशिंगे होती त्यांनी ती चहुबाजूनी वाजवायला सुरवात केली. रात्रीची वेळ असल्याने किती सैन्य वर चढून आले हे खानाला कळेना,खानाला असे वाटले कि खूप मोठी फौज किल्ला चढून येत आहे, रणशिंगे ऐकून विजापूरकरांच्या अनेक सैनिकांनी घाबरून खाली उडया टाकल्या, विजापूरकरांच्याकडे असलेल्या एका कारकून सरदाराने एक हजार फौज घेऊन किल्ला सोडला, तेथून त्याने पळ काढला, कोंडाजी फर्जंद यांनी सातशे गनीम मारले आणि तीनशे जणांना बंदिवान केले. कोंडाजी फर्जंद यांनी ताकदीचा वापर कमी करून युक्तीच्या मार्गाने पन्हाळा ताब्यात घेतला. कोंडाजी फर्जंद यांनी युद्धामध्ये असलेले चाणक्य नीतीचे जे पांच प्रकार आहेत त्याचा उपयोग केला. किल्ला जिंकताना त्याने मानसशास्त्रीय वापरले.
दिग्पाल लांजेकर यांचा हा दिग्दर्शनाचा वैयक्तिक असा पहिला सिनेमा आहे. त्याने यापूर्वी प्रायोगिक नाटके, व्यावसायिक नाटके सादर केली आहेत, तसेच प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मृणाल कुलकर्णी यांच्या बरोबर काम केल होते. दिग्पाल यांना लहानपणापासून इतिहासाची प्रचंड आवड असून त्याने कथाकथन शाळा / कॉलेज मधून केले आहे. त्यांना गोष्ठ सांगता येते शिवाजी महाराजांची कथा मोठया पडद्यावर सांगायची अशी त्याची इच्छा होती त्यातूनच ” फर्जंद ” चित्रपट निर्माण झाला.
शिवाजी महाराज यांच्या बरोबर तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पालकर असे अनेक योद्धे होते, त्याच बरोबर कोंडाजी फर्जंद हा देखील होता. पण त्याची कथा खूप कमी जणांना माहित आहे. त्याने पन्हाळा कसा घेतला, त्याचा हा पराक्रम खूप मोठा आहे. जगाच्या इतिहासात इतक्या कमी वेळात म्हणजे फक्त साडेतीन तासात अवघड असा पन्हाळा किल्ला फक्त साठ मावळ्यांच्या साथीने ताब्यात घेतला, त्यात एक हि मावळा गमावला नाही. त्याची कि कथा लोकांना माहित व्हावी म्हणून हि कथा निवडली. तंजावरचे एकोजीराजे हे शिवाजी महाराज यांचे चुलत भाऊ त्यांच्या पदरी एक कवी होता त्याला सांगितले होते कि शिवाजी महाराज जे जे पराक्रम करतील तो सगळा लिहून काढायचा रोजच्या रोज रोजनिशी लिहायची त्यात त्याने ” पर्णाला पर्वत ग्रहण सम आख्यान ” ह्या पुस्तकात कोंडाजी फर्जंद यांची कथा लिहिलेली आहे. त्याचा संदर्भ घेतला आहे..
चिन्मय मांडलेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारलेली आहे. महाराज पन्हाळा गड घेण्याच्या विचारात असतांना त्याचवेळी बहिर्जी नाईक कोंडाजी ला घेऊन महाराजांच्या समोर येतात, शिवाजी महाराज यांची मोठी व्यक्तिरेखा साकारायला मिळाली हे सर्वात मोठे समाधान आहे. ह्या सिनेमात दहा / अकरा लढाया आहेत, त्यामध्ये प्रत्येक लढाईची पद्धत वेगवेगळी आहे. प्रत्येक मावळ्याकडे वेगवेगळे शस्त्र आहे. शिवाजी महाराज यांच्या हातात दोन तलवारी आहेत, दोन तलवारी घेऊन लढाई करण्याचे शिक्षण दीड महिना घेतले, महाराज एकाच वेळेला आठ जणांशी लढाई करतात हा सीन आम्ही वन टेक मध्ये शूट केला.
या मध्ये चिन्मय मांडलेकर, अंकित मोहन, गणेश यादव, प्रसाद ओक, अजय पुरकर, मृणाल कुलकर्णी, मृणमयी देशपांडे, प्रवीण तरडे, निखिल राऊत, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, हरीश दुधाडे, राहुल मेहेंदळे, राजन भिसे,अंशुमन विचारे, रोहन मंकणी, नेहा जोशी, सचिन देशपांडे प्रद्युमन शिंग असे कलाकार आहेत,


Leave a Reply