बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार “हुकमी चौकट” – कॅप्टनसीचे कार्य !

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मर्डर मिस्ट्री या टास्कमधील दोन आरोपी आस्ताद आणि मेघा पाच खून करण्यामध्ये यशस्वी ठरले होते परंतु गुप्तहेर त्यांच्यावरील आरोप सिद्ध करण्यास अयशस्वी ठरल्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. यावेळेस बिग बॉस यांनी स्मिता आणि सुशांत यांनी खून कसे झाले याचे दिलेले स्पष्टीकरण वाखाण्य जोगे होते परंतु पुराव्यांच्या अभावी ते सिद्ध होऊ शकले नाही असे देखील सांगितले. तसेच काल रात्री बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सगळ्याच सदस्यांना एक सरप्राइज मिळाले तर एक धक्का. बिग बॉसच्या घोषणेनुसार हर्षदा खानविलकर यांनी काल बिग बॉस मराठीचे घर सोडले असून, त्या घरामध्ये फक्त सात दिवसांच्या पाहुण्या होत्या असे सांगितले. हे ऐकताच सगळ्यांना धक्का बसला. हर्षदा ताई बरोबर बाकीचे सदस्य देखील खूप भाऊक झाले. हर्षदा खानविलकर यांनी प्रत्येक सदस्याला एक संदेश दिला. “रेशम जिंकावी हीच माझी इच्छा असेल” आणि मी तिला तशा शुभेच्छा देते” असे त्यांनी जाता जाता सांगितले. तर काल घरामध्ये “SR” म्हणजे कोण याचे कोडे उलघडले. बिग बॉस यांनी शर्मिष्ठाचे घरामध्ये स्वागत करताच सदस्यांना आनंद झाला. तेंव्हा या नव्या सदस्याच्या येण्याने बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काय काय बदलणार आज सुशांत आणि मेघामध्ये कोण घराचा नवा कॅप्टन बनणार कोण कॅप्टनसीच्या टास्कमध्ये बाजी मारणार हे बघणे रंजक असणार आहे.

शर्मिष्ठा  Sai & Sushant.pngघरामध्ये आल्यानंतर तिने आपले मत व्यक्त करण्यास सुरुवात केली. तिला आऊ, मेघा आणि सई ज्याप्रकारे खेळत आहेत ते खूपच आवडते आणि बाहेर देखील हे चांगल्याप्रकारे दाखवले जात आहे असे त्यांना सांगितले. तसेच मेघा आणि सईला संदेश आणि गिफ्ट देखील दिले. ही मैत्री आता पुढे किती टिकणार ? कोण कोणाचा साथ देणार ? हे लवकरच कळेल. तसेच आज घरामध्ये रंगणार आहे कॅप्टनसीचा टास्क. घरातील सदस्य सर्वानुमताने सुशांत आणि मेघाला कॅप्टनसीसाठी उमेदवार म्हणून निवडणार आहेत. बिग बॉस “हुकमी चौकट” हे कॅप्टनसीचे कार्य घरतील सदस्यांवर सोपवणार आहेत. ज्यामध्ये उमेदवारांच्या सहनशीलतेची कसोटी लागणार आहे. यामध्ये घरातील सदस्यच या उमेदवारांच्या समर्थनाचे कार्य करणार आहेत. टीम मेघा आणि टीम सुशांत अशा दोन टीम असणार आहेत. उमेदवारांनी चौकटीच्या ठोकळ्यावर कोणताही आधार न घेता उभे रहायचे आहे. हे दोन्ही उमेदवार त्यांची जागा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत. तसेच प्रतिस्पर्धी उमेदवाराला त्याच्या जागेवरून हटवण्याचा प्रयत्न दुसऱ्या टीममधील समर्थक करणार आहेत. तसेच प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या समर्थकांपासून आपआपल्या उमेदवाराचे रक्षण करण्याचा प्रयत्न त्या उमेदवाराचे समर्थक करणार आहेत. प्रतिस्पर्धी समर्थकांनी दुसऱ्या टीमच्या उमेदवाराला चौकटीच्या कुठल्याही बाजूने खाली उतरण्यास भाग पाडायचे आहे आणि हाच समर्थकांचा उद्देश असणार आहे.

 या टास्कमध्ये सुशांत आणि सईमध्ये बरीच वादावादी होणार आहे. ज्यामध्ये सुशांतने चिडून तिला लायकित रहा असे म्हंटले आहे. आणि सईने देखील सुशांतला धमकी देऊ नकोस असे म्हंटले. हा वाद कुठल्या टोकाला जाणार ? मेघा कि सुशांत कोण बनणार बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन ? प्रतिस्पर्धी उमेदवाराला कोणत्या प्रकारे समर्थक त्रास देणार ? हे बघणे रंजक असणार आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

<span>%d</span> bloggers like this: