हाय फिव्हर.. डान्स का नया तेवर या डान्स रिअलिटी शोमध्ये सगळ्याच स्पर्धक जोड्यांनी उत्कृष्ट परफॉर्मन्सेस दिले. त्यांच्या परफॉर्मन्सेसमुळे केवळ परिक्षक नाही तर, प्रेक्षकही थक्क झाले आहेत. कोणतीही थीम असो वा कोणतेही प्रॉप्स वापरायचे असोत… अपेक्षेपेक्षा खूप चांगली कामगिरी स्पर्धकांनी केली असून नृत्य परफॉर्मन्ससाठीच्या परिक्षणाचा दर्जा यामुळे वाढला आहे. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये, ईशा गुप्ता या नव्या स्टार सेलिब्रिटी जजने सर्व स्पर्धकांसाठी एक प्रॉप आव्हान ठेवले, सर्वच स्पर्धकांनी एलईडी लाईट्स, रंगीत कागद, जाएण्ट व्हील आणि स्लीपर्ससारखी क्वचित वापरली जाणारी वस्तू आपल्या परफॉर्मन्समध्ये वापरली.
केवळ समोरच्याला इम्प्रेस करण्यासाठी नव्हे तर, आपल्या भावना व्यक्त करण्याचे साधन म्हणून नृत्याकडे पाहिले असता, यातल्या एका जोडीने परिक्षकांना अक्षरशः निशःब्द केले आणि त्यांच्या परफॉर्मन्समुळे सगळ्यांचेच डोळे पाणावले. घुंगरांचा वापर प्रॉप म्हणून करून आशिष पाटील या स्पर्धकाने नर्तक बनण्याचा लक्षवेधी व हृद्य प्रवास फारच परिणामकारकरित्या सादर केला. त्याच्या या परफॉर्मन्सला भावनिक आणि अद्वितीय साथ देणाऱ्या ऋतुजानेही या प्रवासाच्या कथेला परफेक्ट स्पर्श केला. या परफॉर्म्नसमुळे लारा दत्ता आणि अहमद खान निःशब्द झाले. ईशा गुप्ताच्या डोळ्यांतून मात्र अखंड अश्रू वाहत होते. भरल्या डोळ्यांनी ईशा गुप्ता म्हणाली, “माझ्या डोळ्यांसमोर साक्षात नटराजच परफॉर्म करीत असल्याचा मला भास झाला. तुझ्या डोळ्यातून आणि चेहऱ्यावरील हावभावांतून तुझे दुःख समजत होते आणि नृत्याप्रति तुझी असलेली ओढ त्यातून दिसत होती. तुझा परफॉर्मन्स किती सुंदर होता, हे मी शब्दात व्यक्तही करू शकत नाही.’’
हाय फिव्हरची परिक्षिका लारा दत्ता हिनेही ईशाला दुजोरा देत म्हटले, “या मंचावर मी आजवर पाहिलेला हा सर्वांत आत्मिक परफॉर्मन्स होता. मला तुझा हा परफॉर्मन्स पाहता आला, याबद्दल मी स्वतःला नशीबवान समजते. तू आज आमची मान अभिमानाने उंचावली आहेस.’’
प्रेक्षकांचे असेच मनोरंजन करण्याचे वचन हाय फिव्हर पूर्ण करणार असून यापूर्वी कधीही पाहिले नसेल, अशा पद्धतीने सुप्त गुणवत्ताही या शोमधून जगासमोर आणण्यात येत आहे.
Leave a Reply