१३ जून २०१८ ते १५ जून २०१८ ह्या कालावधीत ९८ वे अखिल भारतीय मराठी नाटय संमेलन मुलुंड येथील कालिदास नाटयगृहात होणार आहे. या संमेलनाचे खास वैशिष्ठ म्हणजे हे नाट्यसंमेलन सलग ६० साठ तास होणार आहे.
१३ जून ते १५ जून या कालावधीत १४ जून रोजी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचा स्मृतिदिन येतो, दरवर्षी प्रमाणे नाट्य परिषदे तर्फे रंगकर्मींना पारितोषिके आणि जीवन गौरव पुरस्कार प्रदान केले जातात या वर्षी हा सोहळा या नाटय संमेलनात पाहायला मिळणार आहे. हे नाटय संमेलन सलग साठ तास अशी घटना इतिहासात प्रथमच होणार आहे असे नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी सांगितले.
या नाट्यसंमेलनाचे खास आकर्षण म्हणजे संमेलनाध्याक्षा ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांची मुलाखत धनश्री लेले घेणार असून त्याच सुमारास ” संगीत नाटकाचा प्रवास ” हा संगीत नाटकाचा आढावा घेणारा संगीत सुरमय असा कार्यक्रम सादर होईल. परिसंवाद होणार आहे आणि त्याचा विषय ” सांस्कृतिक आबादुबी ” असा आहे, यात डॉ. जब्बार पटेल, चिन्मय मांडलेकर, प्राजक्त देशमुख,केदार शिंदे, भरत जाधव, संतोष पवार, प्रियदर्शन जाधव, प्रताप फड, अशा कलाकार-दिगदर्शकांचा सहभाग असेल. तसेच ” तुका म्हणे ” हि नृत्यनाटिका, ” इतिहास गवाह है ” { एकांकिका }, ” अपूर्व मेघदूत” हे डॉ स्वागत थोरात यांनी बसवलेलं अंध मुलांचे नाटक यांचा समावेश संमेलना मध्ये आहे. या वर्षी कलारजनी ऐवजी एक ” सरप्राईज ” कार्यक्रम सादर होईल. १६ जून ला पहाटे ” सुखन ” नावाचा कार्यक्रम सादर होईल,,
या संमेलनात ” लोककला ,लावणी , झाडीपट्टी मधील दंडार , दशावतार , नमन असे वैविध्यपूर्ण कार्यक्रमाचा सहभाग असणार आहे.या नाट्यसंमेलना मध्ये बाहेरगावी असलेले नाट्यप्रयोगाचे कॉन्ट्रॅक्टर , व्यवस्थापक यांचा सत्कार करण्यात येणार आहे
Leave a Reply