तृषार्त ८ जूनला चित्रपटगृहात

नातेसंबंध हा मानवी जीवनाचा गाभा आहे. कोणतही नातं टिकवण्यासाठीते खुलवण्यासाठी महत्त्वाचं असतं ते त्या नात्यात असणारं प्रेम. आजच्या काळात मात्र नातेसंबंध दुरावत असल्याचे दिसून येते.  बदलती सामाजिक परिस्थिती, भौतिक गरजा यामधून विसंवाद निर्माण होतो. तोच कारणीभूत ठरतो नात्यांमधील विद्रोहाला. हाच विसंवाद केंद्रस्थानी असलेला ‘तृषार्त हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या ८ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

कृष्णा आणि भाऊराव या दाम्प्त्याच्या आयुष्यावर ‘तृषार्त’ चित्रपटाची कथा आहे. काही माणसं नातेसंबंधांपासून पळ काढत स्वतःचं एक वेगळं विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. कृष्णा आणि भाऊराव यांच्या मुलांनी ही स्वत:च वेगळं विश्व निर्माण केलं आहे. पती-पत्नीच्या नात्यातील वीण आणि मुलांच्या नात्यातील भावनिक द्वंद्व याचं चित्रण या चित्रपटात केलं गेलंय. कालानुरूप बदलत गेलेली नात्यांची समीकरणं या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत. ज्योती निवडुंगेमहेश सिंग राजपूतअमूल भुटेदिलीप पोनीसवृंदा बाळ,डॉ. जाधवनिलांगी रेवणकरयोगिता चौधरीअक्षय वर्तक, निशांत पाथरे, विनया डोंगरे, मिलीषा जाधवभूमी मोरेलवे शिंदेचंद्रकांत मिठबाकर या कलाकारांच्या यात भूमिका आहेत. 

तुषार्त.jpg या चित्रपटाच्या निर्मात्या सविता मोरे असून दिग्दर्श अरुण मावनूर आहे. सहनिर्माते सुरेश कुमार सिंग आहेत. कथा आनंद म्हसवेकर व सुरेश प्रेमवती यांची असून पटकथा अरुण मावनूर आणि आनंद म्हसवेकर यांची आहे. संवाद आनंद म्हसवेकर यांनी लिहिलेत. चित्रपटातील गीते यशोधन कदमवैभव चाळके आणि राहुल सोनावणे यांनी लिहिली आहेत. यशोधन कदम यांचे संगीत तर महेश  नाईक  यांचे पार्श्वसंगीत आहे. रवींद्र साठे, साधना सरगम, स्वप्नील बांदोडकर, संजय सावंत, डॉ. नेहा राजपाल,अंजली नांदगावकर, गीता गोलांब्रे, सुजाता पटवा, संचिता मोरजकर यांनी यातील गाणी गायली आहेत. कलादिग्दर्शन विजय मयेकर यांचे आहे. छायाचित्रण अविनाश सातोस्कर यांचे तर संकलन नासीर हाकीम अन्सारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: