‘थिएटर ऑफ रेलेवन्स’चा २५ वर्षीय नाट्यमहोत्सव

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ‘पुणे’ येथे ६,७,८ जून २०१८ रोजी ‘टिळक स्मारक नाट्यमंदिर’ येथे सायंकाळी ५.३० वाजता संपन्न होणार ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ नाट्य दर्शनाचा २५ वर्षीय नाट्य उत्सव!

 १० ऑगस्ट, २०१७ रोजी दिल्ली पासून सुरू झाला “थिएटर ऑफ रेलेवन्स” नाट्य उत्सव, मुंबई, पनवेल, ठाणे येथे प्रत्येक रंग संभावनेला अंकुरित करत आता पुण्यातील ऐतिहासिक भूमी वर ६,७,८ जून २०१८ रोजी ‘टिळक स्मारक, नाट्य मंदिर येथे होणार आहे.

“थिएटर ऑफ़ रेलेवंस” ने जीवनाला नाटकाशी जोडून रंग चेतनेचा उदय करून त्याला लोकांशी जोडले आहे. आपल्या नाट्य कार्यशाळेत सहभागींना मंच, नाटक  आणि जीवनाचा संबंध, नाट्यलेखन, अभिनय, दिग्दर्शन, समीक्षा, नेपथ्य, रंगशिल्प, रंगभूषा आदि विभिन्न रंग पैलूंवर प्रशिक्षित केले आहे आणि कलात्मक क्षमतेला दैवी वरदानापासून बाजूला सारून वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या दिशेला वळवले आहे. 25 वर्षांत 16 हजाराहून अधिक रंगकर्मींनी 1000 कार्यशाळांमध्ये भाग घेतला. जिथे भांडवलदारी  कलाकार कधीही आपली कलात्मक सामाजिक जबाबदारी घेत नाहीत, म्हणूनच “कलेसाठी कला” या चक्रव्यूहात फसून आहेत आणि भोगवादी कलेच्या जात्यात दळण दळून संपत चालले आहेत.

“थिएटर ऑफ़ रेलेवंस” ने “कलेसाठी कला” यांसारख्या औपचारिक आणि भांडवलवादी विचारांच्या चक्रव्यूहाला आपल्या तत्व आणि सार्थक प्रयोगांनी तोडले आहे आणि हजारों रंग संकल्पनांना रोवले आणि अभिव्यक्त केले आहे. आता पर्यंत 28 नाटकांचे 16,000 हून जास्त वेळा प्रयोग, सादरीकरण झाले आहे.

“थिएटर ऑफ़ रेलेवंस” च्या २५ वर्षीय पुणे नाट्योत्सवात काळाला गढणारी  “गर्भ” आणि “अनहद नाद –अनहर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स”  आणि “न्याय के भंवर में भंवरी” प्रसिद्ध नाटके प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.