९८ वे अखिल भारतीय मराठी नाटय संमेलन मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात दिनांक १३ जून २०१८ ते १५ जून २०१८ पर्यंत सलग ६० तास विविध कार्यक्रमाने रंगणार आहे. १३ जून ते १५ जून या कालावधीमध्ये १४ जून रोजी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचा स्मृतिदिन येतो, दरवर्षी प्रमाणे नाट्य परिषदे तर्फे रंगकर्मींना पारितोषिके आणि जीवन गौरव पुरस्कार प्रदान केले जातात या वर्षी हा सोहळा या नाटय संमेलनात पाहायला मिळणार आहे. हे नाटय संमेलन सलग साठ तास अशी घटना इतिहासात प्रथमच होणार आहे असे नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी सांगितले.
ह्या नाट्य संमेलनात रंगणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे
बुधवार दिनांक १३ जून २०१८ – सायंकाळी ४ वाजता ४०० लोककलावंतांचा सहभाग असलेली नाटय दिंडी निघणार असून त्याचा मार्ग पुढील प्रमाणे आहे, मुलुंड पश्चिम रेल्वे स्टेशन – एम.जी.रोड – पाच रस्ता – महाकवी कालिदास नाट्यगृह अशी असणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता @ उदघाटन सोहळा, सुधा करमरकर रंगमंच, प्रियदर्शनी क्रीडा संकुल येथे पार पडणार आहे.. रात्री ९ वाजता — ” संगीत सौभद्र ” हे नाटक महाकवी कालिदास रंगमंचावर सादर करण्यात येईल.
दिनांक १४ जून २०१८ – रात्रौ ००. ३० वाजता – ” पंचरंगी पठ्ठेबापूराव ” महाकवी कालिदास रंगमंचावर सादर करण्यात येईल.
पहाटे ३ वाजता ” रंगबाजी { यमुनाबाई वाईकर यांना समर्पित } महाकवी कालिदास रंगमंचावर सादर करण्यात येईल.
पहाटे ६ वाजता ” प्रातःस्वर ” राहुल देशपांडे आणि आनंद भाटे, किशोरी आमोणकर रंगमंच्यावर सादर करतील.
सकाळी १० वाजता – ” तेलेजू ” हे बालनाट्य महाकवी कालिदास रंगमंच्यावर सादर करण्यात येईल…
सकाळी ११ वाजता,, ” जंबा बंबा बू ” महाकवी कालिदास रंगमंच्यावर सादर करण्यात येईल….
दुपारी २ वाजता _ एकांकिका ” इतिहास गवाह है ” महाकवी कालिदास रंगमंच्यावर सादर करण्यात येईल…
दुपारी ३ वाजता — ” नृत्य नाटिका ” ” तुका म्हणे ” महाकवी कालिदास रंगमंच्यावर सादर करण्यात येईल …
दुपारी ४ वाजता — परिसंवाद ” सांस्कृतिक आबाधुबी ” हेमू अधिकारी रंगमंच्यावर सादर करण्यात येईल….
सायंकाळी ६ वाजता — गो. ब. देवल पुरस्कार वितरण सोहळा तसेच नाट्यसंमेलनाध्यक्षा कीर्ती शिलेदार यांची मुलाखत, नाट्यप्रवेश आणि नाट्यगीत महाकवी कालिदास रंगमंच्यावर सादर करण्यात येईल …
रात्रौ ९ वाजता – ” संगीतबारी ” चा रंगारंग कार्यक्रम महाकवी कालिदास रंगमंच्यावर सादर होईल …
शुक्रवार १५ जून २०१८ –
मध्यरात्री ००. ३० वाजता, ” लोककला जागर सादर होईल यात ” झाडीपट्टी दंडार ” पोतराज , नमन, दशावतार यांचे सादरीकरण महाकवी कालिदास रंगमंच्यावर सादर होईल …
पहाटे ६ वाजता — ” प्रातःस्वर ” किशोरी आमोणकर रंगमंच्यावर सादर करण्यात येईल … {१} सकाळी १० वाजता, एकपात्री महोत्सव डॉ हेमू अधिकारी रंगमंच्यावर सादर होईल… { २ },, सकाळी १० वाजता.. साडे सहा रुपयाचं काय केलंस ? हि एकांकिका महाकवी कालिदास रंगमंच्यावर सादर होईल… सकाळी ११ वाजता,,,, ” चित्र – विचित्र ” हि एकांकिका महाकवी कालिदास रंगमंच्यावर सादर होईल… दुपारी १२ वाजता ,, ” शिकस्त – ए – इश्क ” हे प्रायोगिक नाटक महाकवी कालिदास रंगमंच्यावर सादर होईल,,, दुपारी ३ वाजता,, ” अपूर्व मेघदूत ” हा अंध कलाकारांनी सादर केलेला २ अंकी नाट्यप्रयोग महाकवी कालिदास रंगमंच्यावर सादर करण्यात येईल… सायंकाळी ५. ३०. वाजता ” खुले अधिवेशन आणि समारोप ” ,, रात्रौ ९ वाजता ” रंगयात्रा ” संगीत रंगभूमीचा प्रवास हा कार्यक्रम महाकवी कालिदास रंगमंच्यावर सादर करण्यात येईल…
शनिवार दिनांक १६ जून २०१८ – पहाटे ००.३० वाजता,, ” सुखन ” हा कार्यक्रम महाकवी कालिदास रंगमंच्यावर सादर करण्यात येईल ..
या नाट्यसंमेलनाचे खास आकर्षण म्हणजे संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांची प्रकट मुलाखत धनश्री लेले घेणार असून त्याच सुमारास ” संगीत नाटकाचा प्रवास ” हा संगीत नाटकाचा आढावा घेणारा संगीत सुरमय असा कार्यक्रम सादर होईल. परिसंवाद होणार आहे आणि त्याचा विषय ” सांस्कृतिक आबादुबी ” असा आहे, ह्या मध्ये डॉ जब्बार पटेल, चिन्मय मांडलेकर, प्राजक्त देशमुख, केदार शिंदे, भरत जाधव, संतोष पवार, प्रियदर्शन जाधव प्रताप फड, असे कलाकार / दिगदर्शकांचा सहभाग असेल. तसेच ” तुका म्हणे ” हि नृत्यनाटिका, ” इतिहास गवाह है ” { एकांकिका }, ” अपूर्व मेघदूत ” हे डॉ स्वागत थोरात यांनी बसवलेलं अंध मुलांचे नाटक यांचा समावेश संमेलना मध्ये आहे. या वर्षी कलारजनी ऐवजी एक ” सरप्राईज ” कार्यक्रम सादर होईल. १६ जून ला पहाटे ” सुखन ” नावाचा कार्यक्रम सादर होईल.
Leave a Reply