बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार जुई

बिग बॉस मराठीच्याघरामधून दर आठवड्याला घरामधील सदस्यांपैकी कोणीतरी एक जण घराबाहेर जातो. तसंच या आठवड्यामध्ये देखील कोणा एकाला घराबाहेर जावं लागणार आहे. या आठवड्यामध्ये जुई गडकरी, सई लोकूर आणि आस्ताद काळे हे डेंजर झोनमध्ये आलेआणि जुईला घराबाहेर जावं लागलं. जुई घराबाहेर पडल्याचे दु:ख सगळ्यांच झाले. रेशम, उषा नाडकर्णी, सुशांत,आस्ताद, भूषण खूप भावुक झाले. नेहेमीप्रमाणे बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडलेल्या सदस्याला महेश मांजरेकर घरातील सदस्यांबरोबर बोलण्याची संधी देतात ही संधी जुईला देखील मिळाली. जुईने या वेळेस तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या. तेंव्हा आता पुढील आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईलकोणते टास्क सदस्यांना मिळणार हे बघणे रंजक असणार आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये WEEKEND चा डाव मध्ये सदस्यांनी एकमेकांना गर्विष्ठ, दलबदलू, सांगकाम्या, बोरिंग अशी नावे असलेला मुकुट बहुमताने बहाल करायचा होता. सई लोकूरला गर्विष्ठउषा नाडकर्णी यांना दलबदलू, पुष्कर याला सांगकाम्या तर जुईला बोरिंग असे नाव असलेला मुकुट देण्यात आला. महेश मांजरेकर यांनी सदस्यांचे दोन गट पाडले ज्याचे कॅप्टन पुष्कर आणि रेशम यांना केले. ज्यामध्ये दोन्ही गटांना एक स्कीट तयार करायचे आहे. जो गट जिंकेल त्यांना एक गिफ्ट देण्यात येणार असून महेश मांजरेकर स्वत: सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याला प्राईझ देणार आहेत असे सांगितले. तेंव्हा पुढील आठवड्यामध्ये कळेलच कोण या टास्क मध्ये बाजी मारेल.IMG_3498

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.