बिग बॉस मराठीच्या घरामधून काल जुई गडकरी घराबाहेर पडली. तिचं असं घराबाहेर जाणं कुणाला खटकल तर कुणाला बरोबर वाटल. पन्नास दिवस जुई बिग बॉसच्या घरामध्ये रहात होती तिची कमतरता घरामध्ये जाणवण सहाजिकच आहे. सुशांत आणि स्मिता मध्ये यावरूनच चर्चा होताना आज बघायला मिळणार आहे. सुशांतला जुईच घराबाहेर जाणं पटलं नाही, सईची लोकप्रियता इतकी आहे खरच कि जुई घराबाहेर गेली ?सईने पंधरा दिवस घरामध्ये काहीच केलं नाही तरीसुध्दा ती सुरक्षित होण सुशांतला पटलं नाही असे तो स्मिताला सांगणार आहे. स्मिताच त्यावरच मत आहे कि, ती लोकं खूप नाटकी आहेत सगळं कॅमेरासाठी करतात… यावरची संपूर्ण चर्चा आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज नॉमिनेशन प्रक्रीयेला सुरुवात होणार आहे. काय असणार आजचे नॉमिनेशनचे कार्य ? कोण होणार नॉमिनेट ? कोण होणार सुरक्षित ? कोणामध्ये होणार वाद ? हे बघणे रंजक असणार आहे.
आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. गार्डन एरियामधील सेफ झोन मध्ये प्रथम जे चार सदस्य जातील ते चार सदस्य या आठवड्यातील घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेमधून सुरक्षित होतील. ज्यामध्ये मेघा,पुष्कर, सई आणि शर्मिष्ठा हे चार सदस्य प्रथम त्या सेफ झोन मध्ये जाऊन बसणार आहेत. या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रियेला अनपेक्षित वळण येणार आहे. बिग बॉस आज घरातील सदस्यांना “हाजीर तो वझीर” हे नॉमिनेशनचे कार्य देणार आहेत. या कार्यानुसार सेफ झोन मध्ये फक्त चारच सदस्य असू शकतात. नक्की हे कार्य काय आहे ? खरोखरच हे चार सदस्य सुरक्षित आहे एका ? नॉमिनेशन मधून सुरक्षित होण्यासाठी कोणा मध्ये होणार वाद ? कोण होणार सुरक्षित ?कोणती युक्ती बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य वापरणार ? हे बघणे रंजक असणार आहे.
Leave a Reply