रजनीकांत आणि नाना पाटेकर यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहण्यासाठी सज्ज असलेला ‘काला’ ७ जून रोजी प्रदर्शित होत आहे. त्यापूर्वीच ‘काला’ने तब्बल २३० कोटी रुपयांची कमाई केली आहे. सिनेप्रक्षेपणाचे आणि म्युझिक राइट्स विकून ‘काला’ने सुमारे २०० कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे.
कर्नाटक सोडता तामिळनाडूमध्ये ७० कोटी रुपये, आंध्रप्रदेश आणि निजाममध्ये ३३ कोटी रुपये, केरळात १० तर उर्वरीत देशात ७ कोटी रुपयांसाठी हे राइट्स विकले गेले. तर देशाबाहेर ४५ कोटी रुपयांना प्रक्षेपण राइट्स विकण्यात आले. अशाप्रकारे कर्नाटक वगळता एकूण १५५ कोटी रुपयांची कमाई झाली. याशिवाय म्युझिक राइट्सचे ७५ कोटी रुपये असल्याने एकूण कमाई सुमारे २३० कोटी रुपये इतकी झाली.
पा रंजीत दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती धनुषने केली आहे. सिनेमात रजनीकांत यांची मध्यवर्ती भूमिका आहे. यात रजनीकांत आणि नाना पाटेकर यांच्यातली जुगलबंदी पाहण्यास प्रेक्षक नक्कीच कल्ला करतील..
Leave a Reply