‘मोलोडिस्ट किव’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार ‘हाफ तिकीट’ चित्रपटाचा गौरव

आजवर अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये सहभागी होत गौरविला गेलेला हाफ तिकीट हा मराठी चित्रपट ४७ व्या मोलोडिस्ट किव इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये ही (47thMolodist Kyiv International Film Festivalकौतुकास पात्र ठरला आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा टीन स्क्रीन ज्युरी हा महत्त्वाचा पुरस्कार (‘Best Film’ Teen Screen Jury Main Prize)  हाफ तिकीट चित्रपटाने या महोत्सवात पटकावला आहे.

जगण्याचा संघर्ष व स्वप्नांचा पाठलाग करण्याचा ध्यास याचा मेळ साधणाऱ्या दोन लहानग्यांची धडपड हाफ तिकीटच्या माध्यमातून दिग्दर्शक समित कक्कड यांनी दाखवली आहे. युक्रेन देशाच्या किव या शहरात झालेल्या एका शानदार सोहळ्यात दिग्दर्शक समित कक्कड यांनी हा पुरस्कार स्वीकारला. त्यांनी प्रेक्षक तसेच तिथल्या चित्रपट जाणकारांशी संवाद साधत या चित्रपटामागील भूमिका स्पष्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या शुभम मोरे आणि विनायक पोतदार या बालकलाकारांच्या अभिनयाचं सर्वांनीच भरभरून कौतुक केलं. याशिवाय हाफ तिकिटच्या यशस्वी दिग्दर्शनाबद्दल दिग्दर्शक समित कक्कड यांचे अभिनंदनही केलं.

व्हिडिओ पॅलेसच्या नानूभाई जयसिंघानिया यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात भाऊ कदमप्रियांका बोसउषा नाईकशशांक शेंडेजयवंत वाडकरकैलाश वाघमारे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.हाफ तिकीट या सिनेमाने प्रदर्शनानंतर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंचत्यासोबतच देश-विदेशातील २५ हून अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हाफ तिकिट ने आपला ठसा उमटवला आहे.

 HALF TICKET

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

<span>%d</span> bloggers like this: