बिग बॉसच्या घरातील मेघाचा चाहता वर्ग अधिक

IMG_4023बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रत्येक सदस्याचा त्याचा चाहता वर्ग आहे. कोणी सदस्यांनी तो चाहता वर्ग या कार्यक्रमामधून कमावला आहे. प्रेक्षकांनी देखील त्यांचे आवडतेलाडके स्पर्धक एव्हाना निवडले आहेत. सदस्यांची वागणूक, ते कशाप्रकारे टास्क करतात, ते घरातील इतर सदस्यांशी कसे वागतात, त्यांचे इतर सदस्यांसोबत नाते संबंध कसे आहेत अशा बऱ्याच गोष्टींचा विचार प्रेक्षकवर्ग रोज करत असतो. बिग बॉस मराठीच्या घरातील कॅमेरा तर आहेतच पण हे सदस्य प्रेक्षकांच्या देखील नजरकैदेत असतात असे म्हणायला हरकत नाही. कोणत्या सदस्यांनी कसा टास्क केला, तो आपली टीमशी वा स्वत:शी किती प्रामाणिक आहे हे सगळेच प्रेक्षकांना माहिती असते. बिग बॉस मराठीच्या घरातील अशीच एक सदस्य मेघा धाडे हिने आपल्या स्पष्ट बोलण्याने, खऱ्या वागणुकीने, तिचे सईपुष्कर आणि आऊ यांच्याशी पहिल्या दिवसापासून असलेल्या निखळ मैत्रीने मेघाने प्रेक्षकांची मने आता जिंकायला सुरुवात केली आहे असे म्हणायला हरकत नाही. मेघाने बिग बॉसच्या पहिल्या भागापासून हे सांगितले आणि कबूल केले आहे कि ती बिग बॉसची किती मोठी चाहती आहे. तिने हिंदी भाषेतील बिग बॉसचे सगळे सिझन न चुकता पाहिले आहे. आणि त्यामुळेच बिग बॉस मराठी मध्ये भाग घ्यायची तिची मनापासून इच्छा होती.

बिग बॉस मराठीच्या घरातील मेघाची टास्क करण्याची जिद्द असो वा हा सिझन जिंकण्यासाठी जिद्द असोकिचन मध्ये वेगवेगळे पदार्थ करणे असोवा घराची सफाई असो सगळी कामे ती निष्ठेने करते. मेघाचे हा कार्यक्रमावर इतके प्रेम आहे कि, “ती तिच्या मानलेल्या नवऱ्याच्या घरी आली आहे… सासरी आले आहे मी” असे ती पहिल्यादिवशी कौतुकाने म्हणाली होती.

सईमेघा, भूषणआऊ पुष्कर, रेशम सगळेच हा खेळ खूप छान खेळत आहेत. प्रेक्षक यांच्यावर मनापासून प्रेम करत आहेत. त्यामुळे हा बिग बॉस मराठीचा पहिला सिझन कोण जिंकेल हे बघणे रंजक असणार आहे. कारण या घरामध्ये आलेला प्रत्येकच स्पर्धक जो आता या घराचा सदस्य बनला आहे त्याची हीच इच्छा आहे कि, हा मराठीचा पहिला सिझन त्यानेच जिंकावा. आणि त्या दिशेने ते वाटचाल करताना देखील दिसत आहेत.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: