‘नाट्यदिंडी’त मिळणार लोककलावंताना मानाचे स्थान

मुलुंडमध्ये १३ ते १५ जून दरम्यान सुरु होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनात यंदा राज्यातील लोककला अनुभवता येणार आहे.   यंदा संमेलनात ‘नाट्यदिंडी’ सर्वांचे लक्ष  वेधणार इतके नक्की.  या’ ” नाट्यदिंडी ” ची जबाबदारी श्री सुभाष नकाशे आणि रत्नकांत जगताप { अध्यक्ष रंगमंच कामगार संघ } यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

यंदाच्या दिंडीचे वैशिष्ट म्हणजे या नाट्यदिंडी मध्ये विविध प्रकारच्या लोककलांचे सादरीकरण होणार असून त्यात आदिवासी ढोल, तारपा, बोहडा हे प्रकार वाड्यामधील आदिवासी कलाकार सादर करतील, धनगरी गोफ हा एक प्रकार सादर करण्यासाठी सांगली येथून कलापथक येणार आहे. दशावतार सादर करण्यासाठी सिंधुदुर्ग मधून कलाकार हजेरी लावणार आहेत. दांडपट्टा आणि लेझीम हे सांगली येथील कलावंत सादर करतील, मुंबईच्या कोळी बांधवांचे कोळी नृत्यही  आहे. कागल येथील  लोकप्रिय लेझीम पथक येणार आहे.

या नाट्यदिंडी मध्ये सिंधुदुर्ग चा सहा फुटाचा ” कोंबडा ” सुद्धा आपली उपस्थिती लावणार आहे. कोकणातील मार्गताम्हाणे पालखीचे विशेष असे सादरीकरण रसिकांना बघावयास मिळणार आहे. कोकणात नाचवली जाणारी पालखी या नाट्यदिंडीत पाहता येणार आहे. दांडपट्टा चे धाडसी सादरीकरण सादर करण्यासाठी सातारा येथील पथक तयार आहे. आळंदी येथील ” पावलं ” हा प्रकार पवार महाराज सादर करतील, ह्या शिवाय मुंबई मधील “मोरया ” ढोलपथक आपली हजेरी लावणार असून त्यामध्ये महाराष्ट्रातील कलाकार सहभागी होणार आहेत हे एक वेगळे आकर्षण ठरणार आहे.

samelan       ” नाट्यदिंडी ” मध्ये ४५० लोककलावंतांचा सहभाग असून हि दिंडी १३ जुन २०१८ रोजी दुपारी ४ वाजता मुलुंड स्टेशनच्या बाहेर असलेल्या हनुमान मंदिरापासून सुरु होऊन महाकवी कालिदास कलामंदिर पर्यंत पोहोचणार आहे. महाराष्ट्रातील लोककलावंताना नाट्यदिंडीत मानाचे स्थान देण्यात आले आहे.

या दिंडी मध्ये मावळते संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर आणि नियोजित संमेलनाध्यक्षा श्रीमती कीर्ती शिलेदार आणि स्वागताध्यक्ष मा. विनोद तावडे { मा. मंत्री सांस्कृतिक कार्य,  }  तसेच नाटय – चित्रपट क्षेत्रातील रंगकर्मी यांचा सहभाग असणार आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: