एक अभिनेता आणि निर्माता म्हणून अक्षय कुमार यांनी आत्तापर्यंत हटके आणि अर्थगर्भ चित्रपटांची निवड केली आहे आणि ते त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहिले आहेत. आता ते अगदी पहिल्यांदाच “चुंबक” या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रस्तुतकर्ता म्हणून समोर येत आहेत. ‘रुस्तम’मधील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या या हरहुन्नरी कलाकाराने विविधांगी भूमिकांनी अनेक चित्रपट गाजवले आहेत. ‘पद्मश्री’ने सन्मानित या कलाकाराने जेव्हा मराठी चित्रपट ‘चुंबक’ पाहिला तेव्हा त्याने ते प्रभावित झाले आणि या चित्रपटाची प्रस्तुती करण्याची जबाबदारी घेतली आहे
सोशल मिडीयावरून ही बातमी ‘ब्रेक’ करण्यासाठी अक्षय कुमार यांनी एक व्हीडीओ प्रसारित केला आहे. “काहीतरी अत्यंत प्रामाणिक आणि शुद्ध पाहण्याचा योग आला…ती गोष्ट माझ्या डोक्यात एखाद्या ‘चुम्बका’सारखी पक्की बसली आहे. ती तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटली. मला तुमचे केवळ एक मिनिट हवे आहे.”
प्रख्यात लेखक, गायक, अभिनेता आणि दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते गीतकार स्वानंद किरकिरे हे चुंबकमध्ये मध्यवर्ती भूमिकेत आहेत. होतकरू कलाकार साहिल जाधव आणि संग्राम देसाई हेसुध्दा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमधून पदार्पण करत आहेत. चुंबकचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते संदीप मोदी यांनी केले असून चित्रपटाचे लेखन त्यांनी सौरभ भावे यांच्याबरोबर केले आहे. नरेन कुमार यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
अक्षय कुमार प्रस्तुत मराठी चित्रपट ‘चुंबक’ संपूर्ण महाराष्ट्रात २७ जुलै २०१८ रोजी प्रदर्शित होत आहे
तुम्ही हा व्हीडीओ येथे पाहू शकता :
Leave a Reply