आऊ, सई, स्मिता आणि इतर सदस्यांना मिळणार सरप्राईझ !

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल नॉमिनेशन प्रक्रिया पार सर्व सदस्यांसमोर पार पडली. हा खेळ वैयक्तिकरीत्या कसा खेळायचा हे प्रत्येक सदस्यावर अवलंबून आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही अपात्र सदस्य असतील ज्यांना अजूनही हा खेळ खेळता येत नाही अथवा हा खेळ समजण्या इतपत बौद्धिक चातुर्य नाही, म्हणूनच नॉमिनेशन प्रक्रिया सर्वांसमोर उघडपणे पार पडली. या आठवड्यामध्ये बिग बॉस मराठीच्या घरामधून घराबाहेर जाण्यासाठी शर्मिष्ठा, भूषण हे नॉमिनेट झाले तर घराची कॅप्टन सईला एका विशेष अधिकार देण्यात आला ज्यानुसार ती कोणत्याही एका सदस्याला या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट करू शकते आणि सईने स्मिताला नॉमिनेट केले. तेंव्हा या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर हे बघणे रंजक असणार आहे.

big boss

(सौजन्य – कलर्स मराठी)

बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य आता नवव्या आठवड्यामध्ये पोहचले असून संयमासोबतच आत्मनिग्रह तपासून बघण्याची वेळ आली आहे. यासाठी बिग बॉस सदस्यांवर फ्रीझ – रीलीझ हे साप्ताहिक कार्य सोपवणार आहेत. या कार्या अंतर्गत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना बिग बॉस यांनी खूप सुंदर असे सरप्राईझ देणार आहेत. आज घरामध्ये उषा नाडकर्णी यांचा मुलगा, स्मिताची आई तसेच सईची आई येणार आहेत. उषा नाडकर्णी यांचा मुलगा नंदकिशोर यांच्याप्रती त्याची नाराजगी व्यक्त करताना दिसणार आहे आणि त्यांनी जे काही केले ते चुकीचे केले असे देखील सांगणार आहेत. स्मिताची आई घरामध्ये आल्यावर पहिल्यांदा आऊ यांना भेटणार आहेत. तर सई आईला बघून खूपच भाऊक होणार आहे. प्रत्येक सदस्याच्या परिवारातील सदस्यांनी घरातील सगळ्या सदस्यांना एक संदेश दिला.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.