९८ वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाने मुलुंड दुमदुमले…

९८ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन मुलुंड येथे प्रचंड उत्साहात आणि रसिकांच्या उत्तम प्रतिसादात साजरे झाले.

१३ ते १५ जून या कालावधीत मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यमंदिर – प्रियदर्शनी क्रीडा संकुल येथे मोठ्या उत्साहाने ९८ वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन रसिकांच्या प्रचंड प्रतिसादाने संपन्न झाले

या नाट्यसंमेलनाची सुरवात दिनांक १३ जून रोजी सकाळी ६.३० वाजता महाकवी कालिदास नाट्यमंदिरात चौरंग निर्मित ” मराठी बाणा ” ह्या कार्यक्रमाने झाली हा कार्यक्रम अशोक हांडे यांनी मोठ्या उत्साहात सादर केलादुपारी ४ वाजता ” नाट्यदिंडी ” ला सुरुवात झालीया नाट्य दिंडी मध्ये माविनोद तावडे सांस्कृतिक कार्य मंत्री ), नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळीआमदार सरदार तारासिंगमधुरा वेलणकरअशोक नारकरदिगंबर प्रभूशरद पोंक्षेप्रदीप वेलणकरभरत जाधवविजू मानेसमीर चौगुलेअविनाश नारकरडॉ गिरीश ओकऐश्वर्या नारकरऋतुजा देशमुखमानसी जोशीशुभांगी सदावर्ते,असे अनेक मान्यवर कलाकार आणि रसिक मंडळी होतीया नाट्यदिंडी मध्ये धनगरी गोफसिंधुदुर्ग मधील सहाफुटी कोंबडातारपाबोहडाअसे आदिवासी नृत्य प्रकारमोरया ढोल ताशा पथकदांडपट्टाअसे अनेक प्रकाराने हि नाट्यदिंडी सजली होती,

सायंकाळी प्रियदर्शनी क्रीडा संकुल येथील सुधा करमरकर रंगमंचावर ९८ व्या नाट्य संमेलनांचा उदघाटन समारंभास नांदीने सुरवात झालीत्या नंतर स्वागताध्यक्ष मा विनोद तावडे सांस्कृतिक कार्य मंत्री },प्रमुख पाहुणे माशरद पवार अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी }, मा राज ठाकरे अध्यक्ष मनसे }, उदघाटक सतीश आळेकर ज्येष्ठ रंगकर्मी ], जयंत सावरकर अध्यक्ष ], कीर्ती शिलेदार नियोजित संमेलनाध्यक्ष ], प्रसाद कांबळी नाट्य परिषदेचे अध्यक्ष ], असे रंगमंचावर उपस्थित होतेमान्यवरांनी नटराज पूजन केल्यानंतर उल्हास सुर्वे यांनी तिसरी घंटा दिल्यानंतर उदघाटन समारंभास सुरवात झाली,,

सुरवातीला परिषदेचे प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांनी प्रास्ताविक भाषणात परिषदेच्या निवडणुकीचा आढावा घेऊन आम्ही २ महिने सहा दिवसात नाट्य संमेलनाची आखणी केली या मध्ये अशोक नारकर आणि दिगंबर प्रभू यांचा सिंहाचा वाटा आहे हे नमूद केलंपरिषद हि व्यावसायिकप्रायोगिकबालरंगभूमी बरोबर जोडलेली आहे असे सांगून सभासद संख्या वाढवणेवर्षभर कार्यक्रम करणेमासिक बैठक घेणेअसे धोरण परिषदेने स्वीकारले असून जुलै महिन्या पासून प्रत्येक शाखेला भेटी देणार आहोतया नाट्य संमेलनात बाहेरगावी नाट्य प्रयोग करणारे वितरक यांचा सन्मान परिषद करणार आहे,

त्यानंतर  सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे  यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि२५ वर्षानंतर पुन्हा एकदा मुंबई मध्ये संमेलन घेण्याची पर्वणी आली आहे६० तासाचा सलग नाट्य संमेलन सुरु झाला आहेया मध्ये लोककलांचा अविष्कार आहेएकही व्यावसायिक नाटक नाहीनंतर परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी म्हणालेनाट्य परिषद हि केवळ नाट्यपरिषदेच्या वास्तुपुरती मर्यादित न राहता अधिकाधीक व्यापक कशी होईल हे बघणं खूप महत्वाचं आहेव्यापक म्हणजे काय तर रंगभूमीशी निगडित सर्व घटकांचं परिषद हे केंद्र झालं पाहिजेनाटक ते प्रेक्षक ह्या दोन समृद्ध बेटांना जोडणारा भक्कम सेतू म्हणून परिषदेकडे पाहिलं गेलं पाहिजेह्याचंच पहिले पाऊल म्हणजे यंदाचं हे ६० तासच संमेलनमुंबईकरांना महाराष्ट्र दाखवणं गरजेचं आहे मग झाडीपट्टीची नाटकं असो किंवा इतर लोककला असो अश्या घटकांना संमेलनात सामील करून घेण्याची आवश्यकता होतीपरिषद हि अधिकाधिक व्यापक करण्यावर आमचा संकल्प आहेकारण ह्या परिषदेला ” अखिल भारतीय ” म्हणण्यामागे सगळ्यांना जोडण्याचं आमचं स्वप्न आहे.

ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांनी संमेलनाचे उदघाटन केल्यावर विचार मांडताना ते म्हणालेनाटक हि एक नागरी अर्थात शहरी करमणूक आहेग्रामीण भागात तमाशाखेळेदशावतार हि करमणूक असते.नाटक सादर करताना नाटकाच्या आर्थिक गणिताचा – व्यवसायाचा विचार व्हायला पाहिजे असे सांगून ते म्हणाले नाटकाचा व्यवसाय करताना त्याचे व्यवस्थापन व्यवस्थित करणे महत्वाचे आहे२५ वर्षात अनेक नाटके बदललीनवीन विषय घेऊन संहिता येतातपरिषदेने प्रत्येक ठिकाणी चिंतन शिबीर घ्यायला पाहिजेनाटक आणि समाज यांचा अभ्यास व्हायला हवा.

माजी अध्यक्ष जयंत सावरकर यांनी सांगितलं कि नाट्यगृहाची स्थिती गंभीर आहेत्याकडे नाट्यगृहाच्या व्यवस्थापन मंडळीने लक्ष द्यायला हवेतसेच कलाकारांना पेन्शन मिळायला हवेनिदान जगण्यापुरती तरी रक्कम मिळायला हवीनाटकाची चळवळ सर्वदूर रुजली पाहिजे असे सांगून सेवाभावी वृत्तीने काम करण्यास पुढे यायला हवेत्यानंतर संमेलनाध्यक्षांची सूत्रे त्यांनी कीर्ती शिलेदार यांना प्रदान केली त्यानंतर सई परांजपेविजया मेहतामोहन जोशीप्रशांत दामले यांचा सत्कार करण्यात आला.

NATYA

मनसेचे अध्यक्ष मा राज ठाकरे म्हणालेनाटक हा मराठी माणसाचा जिव्हाळाचा विषय आहेतुमची जबाबदारी मोठी आहेमराठी माणसाला चित्रपटापेक्षा नाटकाचे वेड जास्त आहेनाटके येतात पण त्यातील चालतात कितीचुकीच्या गोष्टी नाट्यक्षेत्रात शिरलेल्या आहेत त्या बाजूला करणे हि तुमची जबाबदारी आहेभव्यता आणि संहिता ह्या दोन गोष्ठी जर एकत्र आल्या तर मराठी प्रेक्षक मराठी नाटकाकडे नक्की येईलआजच्या तरुणतरुणीना मोबाईलच्या माध्यमातून सगळं जग दिसत आहेत्याला जगामध्ये चाललेली थिएटर्स दिसतातनाटके दिसताततो जो भव्यपणा आहे तो मराठी नाटकामध्ये हवा आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष मा शरद पवार म्हणालेसतीश आळेकर यांनी मराठी नाटकाला एक दिशा दिली आहेमहाराष्ट्राची नाटक हि वैभवशाली परंपरा आहेकीर्ती शिलेदार यांच्याकडील संगीत नाटकाचे योगदान पन्नास वर्षाच्या पेक्षा अधिक आहेनाविन्याचा ध्यास लागला पाहिजेनवनवीन कलाकार रंगभूमीवर येण्यासाठी बालरंगभूमीचा पाया मजबूत केला पाहिजेआजची बालरंगभूमी हि उद्याची प्रायोगिक रंगभूमी आहे,आजची प्रायोगिक रंगभूमी हि उद्याची व्यावसायिक रंगभूमी आहेह्या तिन्हीकडे आपण एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघण्याची काळजी घेतली पाहिजेमराठी रसिक हा उत्तम नाटके पाहण्यास येतो त्यासाठी नाटकाचा आशय आणि विचार याकडे लक्ष देणं आवश्यक आहे.

त्यानंतर संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं किवर्षानुवर्षे पंढरीची वारी करणाऱ्या सर्व सामान्य वारकऱ्याला अचानक आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळाला तर त्याची जी अवस्था होईल असे माझे काहीसे झाले आहेमाझे आईवडील हे संगीत नाटकाचे वारकरीत्यामुळे त्यांनी दिलेला संगीत नाटकाचा वसा मी घेतला असून हा वसा मी उतणार नाही,मातणार नाही आणि घेतलेला वसा मी टाकणार नाहीसंगीत नाटकाचे खेळणं हे माझ्याकडे आईवडिलांनी सोपवलंआम्ही संगीत नाटकांच्या बरोबर इतर नाटके सुद्धा सादर करतोमला लहानपणापासून मा.दत्ताराम बापूनीलकंठबुवा अभ्यंकर यांच्या कडून तालीम मिळालीभूमिकेचा भावार्थ जाणातो चेहऱ्यावर आणा आणि मग आपली भूमिका सादर करा असे सांगून त्या पुढे म्हणाल्या कि या निमित्ताने मला असं वाटत किजिथेजिथे आपण नाटक हा विषय शिकवतो तिथे संगीत नाटका विषयी सुद्धा शिकवायला पाहिजेत्यामुळे आपणाला चांगले संगीत कलाकार मिळतीलसंगीत नाटक हि जागतिक देणगी आहे.आपण संगीत नाटकाकडे गांभीर्याने पाहायला हवेमला संगीत नाटकासाठी जे जे करता येईल ते सगळं करण्याची माझी तयारी आहे.

IMG-20180613-WA0032

 

दिनानाथ घारपुरे

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

<span>%d</span> bloggers like this: