९८ व्या नाट्य संमेलनात बालनाटये, संगीत, एकांकिका यांची मेजवानी

सकाळी पहाटे ६ वाजता किशोरी आमोणकर रंगमंचावर गायक कलाकार राहुल देशपांडेआनंद भाटेमंजुषा पाटीलसावनी शेंडे यांचा स्वरांनी रंगत आणली,

सकाळी १० वाजल्या पासून बालनाटये महाकवी कालिदास नाट्यमंदिर मध्ये सादर करण्यात आली. ” बालनाटय ” तेलेजू ” चा प्रयोग नाट्यपरिषद उपनगरीय शाखा आणि रंगसंवाद प्रतिष्ठान संस्थेने सादर केला,लेखन डॉ मीरा शेंगडे यांचे होतेपार्श्वसंगीत आणि दिगदर्शन मिहिका शेंगडे हिने केले होतेप्रकाश योजना गुरु वठारे यांनी सांभाळली होतीया मध्ये आर्या कुलकर्णीशिवानी पवारसांची कांबळे यांच्या प्रमुख भूमिका होत्याहे नाटक नेपाळच्या कुमारी देवी या लोककथेवर आधारित आहेनेपाळमध्ये मुलगी ऋतुमती होण्याआधी तिला ” कुमारीदेवी ” मानलं जातेतिची प्रतिष्ठापना केली जातेओघाने तिचे दर्शन घेणे,चरणस्पर्श पवित्र मानला जातोतिला देवी म्हणून देव्हाऱ्यात बसवतातह्यामध्ये तिच्या बालपणीच्या भावनांचा विचार तिचे आईवडील करीत नाहीतत्यांना समाजात मानाचे स्थान मिळवायचे असतेत्या मुलीला खेळायचे असतेबागडायचे असते पण तिला तिचे बालपण विसरायला लावून तिला देवी च्या जागी बसवताततिला दैवत्वाचा मुखवटा दिला जातो तिला वेगळ्याच पठडीमध्ये जगायला भाग पडतातह्या सर्व रूढी आणि परंपरेवर हे नाटक भाष्य करतेहे नाटक बालकांच्या भावविश्वाचा संबंधित आहे आणि तो पालकांनी गंभीरपणे घ्यायला हवा आहेबालकांचे भावविश्व त्यांच्या पासून हिरावून घेऊ नका यावर हे नाटक विचार करायला लावते.

” जंबा बंबा बु ” हे नाटक ग्रिप्स थिएटर प्रस्तुत – महाराष्ट्र कल्चरल सेंटर ने सादर केलं आहेलेखन श्रीरंग गोडबोलेविभावरी देशपांडे यांचे असून दिगदर्शन राधिका यांनी केलं आहेयामध्ये देवेंद्र सारळकर,श्रीकांत पित्रेहर्षद राजपाठकअश्विनी फाटककाळेऋचा आपटेसक्षम कुलकर्णी यांनी भूमिका साकारलेल्या आहेतजंगल बुक मध्ये राहण्याऱ्या ” मोगली ” ची मध्यवर्ती भूमिका असून हा मोगली जंगल सोडून शहरात येतोआणि तेथे त्याला वेगळे अनुभव येतातशाळेत शिकण्यासाठी तो शाळेत जातो तेथे त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागतेशहरातील अडचणी त्याला समजतात पण तो मात्र आपल्या मित्राना मदत करीत रहातोत्याचे मित्र हिंदूमुस्लिमख्रिस्चन असे असतातसर्वांवर प्रेम करणे त्यांचा आदर करणे हे मोगली करीत असतोहे नाटक संस्कारधर्म जात इत्यादींवर भाष्य करतेएकमेकाला आधार देऊन प्रेम भावनेने जीवन जगावे असा संदेश देणारे नाटक आहे.

” इतिहास गवाह है ” पुणे येथील बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय यांनी ही एकांकिका सादर केलीलेखन चिन्मय देव शुभम गिजे यांनी केलं असून दिगदर्शन ऋषी मनोहर यांनी केलं आहेआजच्या काळावर भाष्य करणारे नाटक असून इतिहासावर आधारलेल्या घटना सादर कारणात त्याचा संपूर्ण अभ्यास करून त्या सादर केल्या जाव्यात असा संदेश हे नाटक देतेकल्पनेतला ऐतिहासिक राजा आणि त्याच्या भोवती फिरणारे कथानक असून त्याकाळातील भव्यता दाखवली आहे.

” साडे सहा रुपयाचं काय केलेस ? ” हि एकांकिका नाट्य परिषद महानगर शाखा सोलापूर यांच्या तर्फे सादर करण्यात आलीलेखन किरण पोत्रीकरकलाकार श्रीनिवास देशपांडे आणि अश्विनी तडवलकर हे होते.भावनाप्रधान नाट्यकृती असून मनाचा ठाव घेणारी अशी कलाकृती आहेप्रदीप आणि माधवी या जोडप्याची कथा आहेप्रदीप हा कलाकार असून पूर्वी त्याने केलेल्या भूमिका गाजलेल्या असतातपण आता काही कारणामुळे त्याला काम मिळत नाहीत्याचा स्वभाव हा स्वाभिमानी असल्यामुळे तो आपणहून काम मागायला कुठेच जात नाहीतसा तो प्रयत्न करतो पण त्याला यश येत नाहीत्याची बायको माधवी हि नोकरी करून संसाराचा गाडा ओढत असतेप्रदीपला काम नाही त्यामुळे घरी बसून असतोत्यामुळे आपापसात त्यांचे जोरजोरात खटके उडतातघटस्फोट घेण्यापर्यंत पाळी जातेएकमेकांची चिडचिड होतेभांडणे होतच असतातप्रदीप आपला खर्च चालविण्यासाठी तो माधवीच्या पर्स मधून पैसे चोरत असतो सुरवातीला माधवी दुर्लक्ष करते पण शेवटी दोघे विभक्त होण्याचे ठरवितातत्याच रात्री ती प्रदीप ला विचारते कि तू घेतलेल्या रुपयांचे काय केलंस प्रदीप सांगतो कि एक सिगरेट चे पाकीट घेतलं आणि आज आपल्या लग्नाचा वाढदिवस असल्याने मी तुझ्यासाठी एक गजरा घेतलातुझ्या डोक्यात मी माळला आहेतो प्रेमाचे प्रतीक असलेला गाजला आणतो आणि पुढे काय शेवट गोड कि सारेच गोड होते,,,, एकमेकांवर प्रेम करणाऱ्या कुटुंबवत्सल जोडप्याची कथा भावभावनेचे प्रसंग असलेली हि एकांकिका परिणाम साधून जाते

” चित्र– विचित्र ” नाट्य परिषद अमरावती शाखा ने हि एकांकिका सादर केलीलेखन दिगदर्शन विशाल रमेश सराफ,, या एकांकीच्या विषयी विशाल सराफ यांनी सांगितले किएका घडलेल्या घटनेवरून ह्या एकांकीचेची कल्पना सुचलीसमाजात वावरत असताना बऱ्याच ठिकाणी नियमावली पाळली जात नाहीतसे केलेलं आढळून येत नाहीकिंवा लोकशाहीसंविधान मध्ये जे लिहलेलं आहे त्याच पालन केलेलं दिसत नाहीखरी लोकशाही जी आहे त्याचे पालन व्हायला हवे असा संदेश हे नाटक देते,,,

” शिकस्त – ए – इष्क ” ड्रीम थिएटर्स मुंबई ने हि एकांकिका सादर केलीलेखन दिगदर्शन सिद्धार्थ साळवी यांचं आहेमुस्लिम समाजातील ” इद्दत ” या प्रथेमुळे होणाऱ्या विधवा स्त्रियांच्यावर हे नाटक भाष्य करतेनाटकाचा विषय हा गंभीर आहेएका प्रेम कथेची शोकांतिका ह्या मध्ये मांडली आहेएक हृदयस्पर्शी कहाणी ह्यात पाहायला मिळेलएक मुस्लिम मुलीच्या भोवती कथानक फिरतेएका मुस्लिम मुलीचा विवाह शौहर नावाच्या मुलाबरोबर ठरतोपण त्यामुलीचे प्रेम त्याच्यावर नसतेपण तिला लग्न करावे लागतेएक दिवस शौहर हज च्या यात्रेला जातो पण तेथे त्याचा मृत्यू होतोती मुलगी विधवा बनते,त्याचवेळी तिचा दीर त्याघरात येतो त्या दोघांचे सूत जमतेपण त्यांच्या प्रेमाला घरच्यांचा विरोध असल्याने ती मुलगी ” मृत्यू ” ला जवळ करतेतिचे प्रेम सफल होत नाहीत्या स्त्रीच्या मनातील भावभावनाचे हिंदोळे छान व्यक्त झाले आहेतनाटकाची मांडणी हि प्रवेशागणिक उंची गाठत जातेनाटकातील सर्वच कलाकारांनी कामे छान केली आहेत प्रत्येक व्यक्तिरेखा हि महत्वाची असून ती स्वतंत्र आहेप्रकाश योजना उत्तमसादरीकरण मनाचा वेध घेते,,

” अपूर्व मेघदूत ” आरलिन प्रोडक्शन पुणे यांनी ह्या नाटकाचे सादरीकरण केलं असून नाटकाचे लेखन गणेश दिघे यांचे आहेहे नाटक १९ अंध कलाकारांनी सादर केलं आहेमहाकवी कालिदास च्या ” मेघदूत ह्या काव्यावर आधारित ह्या नाटकाची बांधणी केली आहेया नाटकात नृत्यनाट्यकाव्य इत्यादीचा समावेश उत्तमपणे केला असून अंध कलाकांरानी केलेली ही कलाकृती मनाला भावते.

” रंगयात्रा – संगीत रंगभूमीचा प्रवास “,,,, हा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ने सादर केलाह्या मध्ये सुरवाती पासून संगीत रंगभूमीचा आढावा घेतला असून त्यामध्ये नाटककार – कलाकार – त्यांचे लेखन इत्यादींवर उत्तमपणे भाष्य केलं असून ते संपूर्णपणे माहिती पूर्ण असे असल्याने कार्यक्रमाची रंगत वाढतच गेलीसोबत संगीत रंगभूमीवर काम करणाऱ्या चारुदत्त आफळेमानसी जोशीशुभांगी सदावर्ते,नचिकेत लेलेकेतकी चैतन्य इत्यादी मान्यवर कलाकारांनी नाट्यपदे उत्तमपणे सादर केल्याने कार्यक्रमाची उंची वाढली,

ह्या सर्वच कार्यक्रमाना रसिक जाणकार प्रेक्षकवर्ग हजर होतानाट्य संमेलनाचे सर्वानी कौतुक केले संपूर्ण टीम ला शुभेच्छा दिल्या,,,

 

दिनानाथ घारपुरे

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

<span>%d</span> bloggers like this: