बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल भूषण कडू घराबाहेर पडला. त्याच्या जाण्याचे दु:ख बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सगळ्यांच झाले. आता येत्या आठवड्यामध्ये घरातील सदस्य कोणाला नॉमिनेट करणार ? कोण सुरक्षित होणार ? हे लवकरच प्रेक्षकांना कळेल. बिग बॉस यांनी मागील आठवड्यामध्ये सदस्यांवर “ध्वज विजयाचा उंच धरा रे” हे कॅप्टनसी कार्य सोपावले होते. ज्यानुसार कॅप्टन तोच होणार होता जो विजयाचा झेंडा रोवेल. पूर्वीच्या काळी प्रतिस्पर्धी राज्यावर सत्ता प्रस्थापित केल्यावर तिथे झेंडा फडकविण्याची प्रथा होती. थोडक्यात प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करून त्याच्यावर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी झेंड्याचा प्रतीकात्मक वापर होत असे. कॅप्टनसीच्या कार्यात या झेंड्याची महत्वाची भूमिका होती. मागील आठवड्यात घराचा कॅप्टन होण्यासाठी मेघा, आस्ताद आणि पुष्कर हे तीन उमेदवार मैदानात उभे होते. या तिघांमध्ये सरस ठरत विजयाचा ध्वज फडकवण्यामध्ये पुष्कर यशस्वी ठरला आणि तो बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन बनला. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नॉमिनेशन प्रक्रिया सुरु होणार असून घरातील सदस्य कोणती नवी युक्ती योजणार ? कोणाला नॉमिनेट करणार ? हे बघायला विसरू नका आज रात्री ९.३० वा. बिग बॉस मराठीमध्ये फक्त कलर्स मराठीवर.
बिग बॉस आज सदस्यांना “बोचरी टाचणी” हे नॉमिनेशन कार्य सोपवणार आहेत. ज्यानुसार बझर वाजल्यानंतर फुगे फोडत सदस्यांना नॉमिनेट करायचे आहे. तसेच आज कोण कोणाला नॉमिनेट करणार यावर सदस्यांमध्ये चर्चा होताना दिसणार आहे.
Leave a Reply