राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने यांच्या बहुप्रतीक्षित‘यंग्राड’ चित्रपटाचा ट्रेलर अभिनेता शरद केळकर, सविता प्रभुणे,शशांक शेंडे, चैतन्य देवरे, सौरभ पडवी, शिव वाघ, जीवन कराळकर आणि शिरीन पाटील या चित्रपटातील कलाकारांच्या प्रमुख उपस्थित मुंबईत नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यावेळी विठ्ठल पाटील प्रॉडक्शन्सचे विठ्ठल पाटील, फ्युचरवर्क्स मिडिया लिमिटेडचे गौतम गुप्ता व गौरव गुप्ता आणि फँटम फिल्म्सचे मधु मंटेना उपस्थित होते.‘यंग्राड’ चित्रपटाची निर्मिती फँटम फिल्म्स, फ्युचरवर्क्स मिडिया आणि विठ्ठल पाटील प्रॉडक्शन्सने केली असून हा चित्रपट ६ जुलै २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
ट्रेलर पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
http://bit.ly/YoungraadTrailer
Leave a Reply