शिक्षणाचं महत्व अधोरेखित करणारा ‘शिक्षा’ लघुपट

‘शिकाल तर टिकाल’ हे कुणीतरी उगाच नाही म्हणून ठेवलंय. ‘शिक्षण’ हा प्रत्येक बालकाचा अधिकार आहे. शिक्षणामुळे प्रत्येकासाठी नवी क्षितिजं खुली होतात, शिक्षण आपल्याला जगण्याचं नवं बळ आणि स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याचं सामर्थ्य देतं. अशा या शिक्षणाचं महत्व अधोरेखित करणारा ‘शिक्षा’ हा लघुपट लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे.
Shiksha a short film (1)
‘कलाश्री इंटरटेनमेंट’ निर्मित ‘शिक्षा’ या लघुपटाचे पोस्टर आणि ट्रेलर नुकतेच लॉन्च झाले असून त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या लघुपटातून ‘गाव गाता गाजली’ फेम बालकलाकार सार्थक वाटवे एका नव्या रूपात आपल्या समोर येत आहे. या मालिकेत क्रिशच्या भूमिकेत दिसलेला सार्थक या लघुपटात प्रमुख आणि एका वेगळ्या भूमिकेत दिसून येणार आहे.
 
 
आपण नेहमीच आपल्या आजूबाजूला काही गरीब मुलांना काम करताना पाहतो, जसे रस्त्यावर वृत्तपत्र आणि खेळणी विकणे, बूट पॉलिश करणे, कचरा आणि प्लास्टिक किंवा भंगार गोळा करणे अशी कामे करताना अनेक लहान मुले आपल्या नजरेस रोज पडत असतात. त्यावेळी आपण त्यांना काही खाद्यपदार्थ, पैसे किंवा आपल्या मुलांनी वापरलेले जुने कपडे देऊ करतो. पण आपण त्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत गरजेचा विचार कधी करतो का? तर नाही. हिंदी मध्ये ‘शिक्षा’ म्हणजे शिक्षण आणि मराठीमध्ये ‘शिक्षा’ म्हणजे दंड . त्या मुलांची गरज आणि आपण केलेली मदत लक्षात घेता या दोन वेगवेगळ्या भाषेतील एकाच शब्दाच्या दोन अर्थांचे केलेले चित्रण म्हणजे हा लघुपट.
पाहा ‘शिक्षा’ लघुपटाचा ट्रेलर  :  https://youtu.be/UN3DnqGCzRU

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.