९८ वे नाट्य संमेलन – एक वेगळी ऊर्जा देणारा समारोप समारंभ

१३ ते १५ जून २०१८ या कालावधीत मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्य मंदिरात तुफान रंगलेले ९८ वे नाट्य संमेलनाचा समारोप समारंभ प्रियदर्शनी क्रीडा संकुल येथील सुधा करमरकर रंगमंच येथे मोठ्या उत्साहात साजरा झालाया प्रसंगी प्रमुख पाहुणे माश्री उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख ], मा श्री सुशीलकुमार शिंदे ज्येष्ठ नेते काँग्रेस ], मा विनोद तावडे सांस्कृतिक मंत्री प्रसाद कांबळी [अध्यक्ष नाट्य परिषद ], कीर्ती शिलेदार अध्यक्षा नाट्य संमेलन ], असे मान्यवर उपस्थित होते.

98 sammelan 2

सुरवातीला प्रास्ताविक भाषणात परिषदेचे उपाध्यक्ष डॉ गिरीश ओक यांनी आत्तापर्यंत झालेल्या नाट्य संमेलनामधील कार्यक्रमाचा आढावा घेतलात्या नंतर मुंबई बाहेर महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी नाट्य प्रयोगाची व्यवस्था करणारे रंगकर्मी वितरक याना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेत्यांच्या वतीने जयंत जातेगावकर यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर नाट्य परिषदेने संपादित केलेल्या ९८ व्य नाट्य संमेलनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन मा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलेत्यानंतर प्रसाद कांबळी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले किसुरवातीला मी सर्वाना नाट्यरसिकांनो असे संबोधन केलं होते आता मी सर्वाना ” नाट्य नातलग ” असा मुद्दाम उल्लेख करीत आहेयाचे कारण आपण जो प्रतिसाद दिला तो अविस्मरणीय असा आहेनाट्य परिषद हि या पुढे भक्कम सेतू म्हणून कार्यरत राहीलसंमेलन यशस्वी करण्यासाठी सर्व सदस्य मुलुंड शाखा नाट्य परिषदेचे अध्यक्ष अशोक नारकर आणि दिगंबर प्रभू यांचे कौतुक केलेस्वागताध्यक्ष विनोद तावडे म्हणालेह्या नाट्य संमेलनात तीन दिवस रंगभूमी परिवार होता असे मला जाणवलेया परिवारातील सर्वच घटक एक दिलाने काम करीत होतेदोन वर्षाचे टार्गेट ठरवलं पाहिजेमराठी रंगभूमी विषयी जी जी आव्हाने आपल्याला वाटतात ती सगळी आव्हाने पुढच्या दोन वर्षांमध्ये आपण सगळे मिळून ती सशक्तपणे पेलूयामराठी रंगभूमीसाठी योजना तयार करूया,, हे नाट्य संमेलन ” टी फॉर थिएटरटी फॉर ट्रँकआणि टी फॉर थक्क ” करणारे आहेरंगभूमीच्या मागे जे कलाकार काम करतात जे बॅक स्टेज आर्टिस्ट आहेत यांच्यासाठी मेडिमेक्सची योजना महाराष्ट्र शासन मार्फत परिषदेच्या सहकार्याने तयार करण्याचा मानस व्यक्त केलासंमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांनी रसिकांनी जो तीन दिवस प्रतिसाद दिला त्या बद्दल सर्वांचे आभार मानलेआणि जे कलाकार उमेदवारी करतात यांच्यासाठी निवास व्यवस्था करावी अशी विनंती केली.

 98 ve Natya Sammelan Samarop Mulund.1

मा सुशीलकुमार शिंदे म्हणाले माणूस जन्माला येतो त्यावेळी त्याला नाव नसते पण श्वास असतोआणि त्याच आयुष्य संपत त्यावेळी त्याला नाव असत पण श्वास त्याला घेता येत नाहीत्याच्या जीवनामध्ये तो संपूर्ण नाट्य पाहतोप्रत्येक घराघरातून नाट्य नाट्य चालतंआपली आई मुलाला नाटक शिकवीतच असतेनाट्य संमेलनाच्या साठी अध्यक्षा म्हणून कीर्ती शिलेदार यांची निवड योग्यच आहे संगीत नाटक त्यांच्या घरात आहेचमराठी नाट्य रसिक नाटकाचा आनंद घेण्यासाठी तयार असतात आणि ते देण्याचे काम तुम्ही केलंतआपण जे तीन दिवस जागरण केलंत ते रसिकतेचे फार मोठे उदाहरण आहेसोलापूर मध्ये झालेल्या ८८ व्या नाट्य संमेलनात मी होतो आणि त्या संमेलनात उरलेल्या पैश्यातून आम्ही निर्मलकुमार फडकुले यांच्या नावाने एक नाट्यगृह बांधले ते प्रायोगिक नाट्य कलावंतांना देण्यात आलेतुम्ही सुद्धा ग्रामीण भागात एक नाट्यगृह उभे करावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केलीमा उद्धव ठाकरे म्हणाले आम्ही येथे आमचा राजकीय रंग मेकप बाहेर उतरवून रसिक म्हणून आलो आहोतथिएटर चांगलं असलं तरी गर्दी होत नाही तर नाटक सुद्धा उत्तम हवेरंगभूमीचा इतिहास हा १७५ वर्षाचा आहे त्या संबंधीचे एक भव्य दालन आम्ही बिर्ला क्रीडा केंद्र गिरगाव मुंबई येथे उभारण्याचे योजले आहे.

एक वेगळी ऊर्जा देणारा समारोप संपन्न झालाउपस्थित सर्वच रसिकजनांच्या चेहऱ्यावर आनंदाचे आणि उत्साहाचे रंग दिसत होतेसर्वचजण कार्यक्रमाचे कौतुक करीत होते.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: