‘काय झालं कळंना’ चित्रपटाचे धमाकेदार म्युझिक लॉण्च

प्रेमकथेला सुमधूर गीत-संगीताची जोड दिल्यास ती रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात यशस्वी होते. हे लक्षात घेऊनच काय झालं कळंना’ या चित्रपटातील प्रेमकथेलाही कर्णमधुर गीतांची किनार जोडण्यात आली आहे. काय झालं कळंना’, ‘टकमक टकमक’, ‘रुतला काटा’, ‘फुटला टाहो’, ‘चंद्रकोर’ अशा वेगवेगळ्या जॉनरची पाच गीते या चित्रपटात असून ही गीते माधुरी अशिरघडेवलयशौनक शिरोळे यांनी लिहिली आहेत. संगीत पंकज पडघन याचं आहे. आदर्श शिंदेसायली पंकजरोहित राऊतरुपाली मोघेसौरभ साळुंखे यांनी गीते स्वरबद्ध केली आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने रसिक प्रेक्षकांना सुरांची अनोखी म्युझिकल ट्रीट अनुभवता येणार आहे. तरुणाईच्या ओठांवर सहज रुळतील आणि लोकप्रिय ठरतील अशी गाणी या चित्रपटात आहेत.

या चित्रपटाद्वारे गिरीजा प्रभू व स्वप्नील काळे नवी जोडी रुपेरी पडद्यावर पkay jhala kalanaदार्पण करीत असून या दोघांसोबत अरुण नलावडेसंजय खापरेवंदना वाकनीसकल्पना जगतापश्रद्धा सुर्वेहेमाली कारेकर,सुयश झुंजुरकेरवी फलटणकरयांच्या भूमिका आहेत. भन्नाट व्यक्तिरेखा भरपूर स्टंट,प्रेमकहाणी असा सगळा मसाला या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

श्री धनलक्ष्मी प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या काय झालं कळंना या चित्रपटाचे निर्माते पंकज गुप्ता असून दिग्दर्शन व कथा सुचिता शब्बीर यांची आहे. पटकथा किरण कुलकर्णी व पल्लवी करकेरा यांची आहे. संवाद लेखन राहुल मोरे आणि सुचिता शब्बीर यांचे आहेत. नृत्यदिग्दर्शन सुजीत कुमारसुचिता शब्बीर यांचं आहे. छायाचित्रण सुरेश देशमाने याचं असून संकलन राजेश राव यांचं आहे. चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी शब्बीर पुनावाला सांभाळत आहेत.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: