इसिस २ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

असंख्य देश आज या दहशतवादाच्या कचाट्यात सापडले आहेत. दररोज माध्यमांमधून घातपाताच्या आणि हिंसाचाराच्या घटना आपण ऐकतोय. विमान अपहरणाची अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर दहशतवादाचा क्रूर चेहरा दाखविणारा चित्रपट आपल्यासमोर येतोय. दहशतवादाचे वास्तव दाखवून देत एका विमान अपहरणाची गोष्ट सांगणाऱ्या इसिस  एनिमीज ऑफ ह्युमिनीटी ( ISIS II )  या इंग्लिश व हिंदी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच दिमाखात संपन्न झाला. अटलांटिक फिल्म्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन व संकलन युवराज कुमार यांचे असणार आहे.

ISIS II - STANDY

दहशतवाद्यांना दिल्या जाणाऱ्या प्रसिक्ष्नावर चित्रपटाच्या पहिल्या भागात भाष्य करण्यात आले होते. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात दहशतवाद्यांकडून केल्या जाणाऱ्या विमान अपहरणाची तसेच या अपहरणनाट्यानंतर वेगवेगळ्या देशातल्या सुरक्षा यंत्रणांनी घेतलेल्या भूमिकेबद्दलची कथा मांडण्यात आली आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून दुसरा भागसुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास दिग्दर्शक व कलाकारांनी यावेळी व्यक्त केला.

रशीद नाझरिपी कौलहरीश भिमानी युवराज कुमारराहुल देव, रवी खन्नाहुमा अलेक्झांडरलीवोनेलमनोज पवारस्वप्नील मक्षीमकमल करमचंदानीरीचड भक्तीअॅलेक्स अॅडमडेव्हिड जुमाजावेद जय,विनोद जेठमलानीकौशिक चक्रवर्तीमनीषा राम केळकर गॅरी या कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. हेमंत राम केळकर यांची पटकथा असून हरीश भिमानी यांनी चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. हनी शर्मा चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक असून कलादिग्दर्शक अरुण राठोड आहेत. आकाश राज चित्रपटाचे छायांकन करणार आहेत. रंगभूषा प्रकाश साळवी यांची असणार आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.