‘ झिपऱ्या’ परिक्षण – जगायला लावणारा चित्रपट

 मुंबई मधील उच्च वर्ग असो किंवा सर्व सामान्य माणुस असो त्यांच्या लेखातून, कथा – कादंबरीतून त्याचे प्रतिबिंब दिसते. त्यांच्याच ” झिपऱ्या ” ह्या गाजलेल्या कादंबरीवर ए. आर. डी. प्रोडक्शन आणि दिवास प्रोडक्शन या चित्रपट संस्थेतर्फे ” झिपऱ्या ” ह्या सिनेमाची निर्मिती करण्यात आली असून निर्मिती रणजीत दरेकर यांची आहे,,,  प्रस्तुतकर्त्या अश्विनी रणजीत दरेकर ह्या असून सहनिर्माता अथर्व पवार क्रिअशन यांचे आहे. कथा अरुण साधू यांची असून पटकथा / संवाद / दिग्दर्शन केदार वैद्य यांचे लाभले आहे. संगीताची बाजू समित सप्तीस्कर- ट्रोय- अरिफ यांचे आहे. संकलन देवेंद्र मुर्डेश्वर, आणि पार्श्वसंगीत तौफिक कुरेशी यांचे आहे छायाचित्रण राजेश नडोने यांचे आहे. या मध्ये चिन्मय कांबळी, प्रथमेश परब, सक्षम कुलकर्णी, अमृता सुभाष, नचिकेत पूर्णपात्रे, प्रवीण तरडे, अमन अत्तार, हंसराज जगताप, देवांश देशमुख, विमल म्हात्रे, दीपक करंजीकर, हे कलाकार असून त्यांनी आपापल्या व्यक्तिरेखा उत्तम साकारलेल्या आहेत.
       माणुस  कुठे जगतो त्या पेक्षा तो कसा जगतो ह्याचे चित्रण ह्या सिनेमात बघायला मिळेल, अनेक माणसे गरीब परिस्थितीशी झगडून, त्यांच्या समोर येणाऱ्या संकटाशी सामना करीत जीवन जगत असतात, बूट पोलिश चा व्यवसाय करणाऱ्या मुलांचे जीवन कसे असते, रेल्वे स्टेशनवर त्यांना बूट पोलिश करावे लागते. सर्व सामान्य माणसाचे जीवन त्यांना जगायचे  असते  पण परिस्थिती आणि नियती त्याला तसे जगायला देत नाही. अशी एक संवेदनशील कथा ” झिपऱ्या ” मध्ये मांडली आहे. झिपऱ्या बूट पोलिश करून जीवन जगतो पण तो कोणाकडे भीक  मागत नाही..
           किसना उर्फ झिपऱ्या हा रेल्वे स्टेशनवर बूट पोलिश करून आपली उपजिविका करीत असतो. त्याला एक लीला नावाची बहिण आणि आई असते, त्याचा मित्र-परिवार हा मोजकाच पण त्याच्यावर प्रेम करणारा असतो. त्याच्या मित्रपरिवारात नाऱ्या, असलम, पोम्ब्या, गंजू, दाम्या, असे मित्र असतात, सर्वजण बूट पोलिश करून जे मिळेल ते त्यांचा दादा पिंगल्या दादा यांच्या कडे आणून देतात आणि मग पिंगल्या ते पैसे स्वतःकडेजास्त ठेऊन इतरांना वाटून टाकतो, बूट पोलिश चा धंदा करताना त्यांना असंख्य संकटाना सामोरे जावे लागते, आजूबाजूला असलेल्या इतर कंपू त्यांना त्रास देत असतात, बूट पोलिश धंदा करताना त्यांना परवाना मिळालेला नसतो त्यामुळे त्यांना पोलिसाचे हप्ते द्यावे लागतात, एक दिवस पिंगल्या आणि झिपऱ्या यांच्यात भांडण होते आणि त्यामध्ये पिंग्ल्याचा अपघाती मृत्यू होतो, आता झिपऱ्या कडे सारी सूत्रे येतात, पण झिपऱ्या मिळालेल्या पैश्याची समान वाटणी करतो, बूट पोलिश करणाऱ्या सर्वांची जबाबदारी झिपऱ्या वर असते.
           झिपऱ्या हा काही दादागिरी करणारा मुलगा नाही, त्याच्या ग्रुपमध्ये  नाऱ्या नावाचा मुलगा असतो हा मारामारी करण्यात पटाईत असतो, झिपऱ्या जे सांगेल ते तो ऐकतो, झिपऱ्या ज्या ज्या वेळीस संकटात येतो त्यावेळी नाऱ्या त्याला मदत करतो, एक दिवस नाऱ्या ला घेऊन झिपऱ्या घरी येतो, पण तिथे तो टिकत नाही, काही कारणामुळे त्याला तेथून बाहेर जावे लागते, तसा नाऱ्या साधाभोळा असल्याने त्याच्यावर हि पाळी येते, असलम हा झिपऱ्या चा दुसरा मित्र ह्याला सिनेमाचे वेड असते, फिल्मी संवाद म्हणून दुसऱ्यावर छाप मारायची हे त्याला चांगले जमते तसा तो बोल बच्चन असतो, झिपऱ्या ला लीला नावाची बहिण असते  ती पारसी बाई कडे कामाला असते, पारसी बाई तिला सांगते कि तू ती वस्ती सोडून माझ्या बरोबर रहा पण लीला काही ऐकत नाही एक दिवस ती झिपऱ्या ला घेऊन पारशी बाई कडे जाते बाई त्याला सांगते कि तू शाळा शिक मोठा हो शिक्षण हे महत्वाचे आहे, झिपऱ्या चे शाळेमध्ये जायला लागतो तो आपल्या मित्रांना सुद्धा शाळेत घेऊन जातो,

              एक दिवस झिपऱ्या च्या लक्षांत येते कि धंदा आपल्याला बंद करायला लागणार, कारण हल्ली कोणीच बूट पोलिश करून घेत नाहीत, मग दुसरा धंदा करायचा ह्या साठी तो आपल्या मित्रांना सांगतो कि तुम्ही तुमच्या आवडीचा धंदा करा कारण आता ह्या धंद्यामध्ये काही राहिलेलं नाही. त्यात त्या रेल्वे स्टेशन मधील पक्या दादा बरोबर त्याचे भांडण होते ते नेमके काय आणि कश्यामुळे घडते हे सारे झिपऱ्या सिमेनात कळेल,,,,

 ziparya.png
             मुंबईसह  अनेक मोठ्या रेल्वे स्टेशनवर आपण अनेकदा बूट पॉलिश करणारी किशोरवयीन मुले बघितली असतील.  ‘झिपऱ्या’ चित्रपट अशाच मुलांच्या भोवती फिरणारा आहे.  यामध्ये रेल्वे स्टेशनवर बूट पॉलीश करणाऱ्या एका तरुणाचा अंधारातून प्रकाशाकडे जाणारा प्रवास मांडण्यात आलेला आहे. सभोवतालची परिस्थिती कितीही आव्हानात्मक असली तरी सुद्धा भविष्याबाबत तो निराश नाही. दरम्यान, या जगण्याच्या संघर्षात झिपऱ्याला पोलिसांची भीती का वाटू लागते? झिपऱ्या आपल्या बहिणीच्या लग्नाच्या टेन्शन मध्ये नेमकं काय काय करतो? असे अनेक प्रश्न या चित्रपटात पडतात, या कथेत असलेलं एक गूढ आणि त्या भोवती घेरलेलं झिपऱ्या चं आयुष्य आहे. तर दुसऱ्या बाजूला दारिद्र्य, हालअपेष्टा यांच्यावर मात करून स्वतःसह मित्रांच्या आयुष्यात सोनेरी रंग भरण्यासाठी तो  धडपड करत आहे. वास्तवदर्शी  चित्रीकरण, वेगवान कथानक आणि आयुष्याकडे पहाण्याची सकारात्मक दृष्टी  हे झिपऱ्या चे मुख्य मुद्दे आहेत.  ” झिपऱ्या ” मध्ये सामाजिक आशय आहे, त्या मुलांची मानसिकता – समाजाकडे बघण्याची भावना त्यांनी आणि  समाजाबरोबर जोडलेलं एक वेगळ्या प्रकारचे नाते ह्या मध्ये चित्रित केल आहे. झिपऱ्या मध्ये झिपऱ्या बरोबर नाऱ्या, असलम, आणि लीला ह्या व्यक्तिरेखा प्रभावीपणे साकारलेल्या आहेत,
          झिपऱ्या मध्ये सर्वच  कलाकारांची कामे सुरेख झाली आहेत, प्रत्येकाला आपापल्या व्यक्तिरेखा समजलेल्या आहेत, दिग्दर्शक केदार वैद्य यांनी चित्रपट उत्तम बंदिस्तपणे सादर केला आहे, कथेमधील व्यक्तिरेखा त्या त्या कलाकरांनी फुलवल्या आहेत, बूट पोलिश करणाऱ्या मुलांचे जीवन कसे असते त्यांना कोणत्या संकटाना सामोरे जावे लागते हे सारे चित्रण सिमेमात आहे, चिन्मय कांबळी ह्याचा झिपऱ्या, अमृता सुभाष हिने लीला अप्रतिमपणे सादर केली आहे, नाऱ्या च्या भूमिकेला सक्षम कुलकर्णी यांनी न्याय दिलेला आहे त्याचा साधेपणा त्याने छान व्यक्त केलाय, असलम च्या भूमिकेत प्रथमेश परब लक्षांत रहातो, ह्या शिवाय नचिकेत पूर्णपात्रे, प्रवीण तरडे, अमन अत्तार, हंसराज जगताप, देवांश देशमुख विमल म्हात्रे, दीपक करंजीकर ह्यांचा भूमिका यथायोग्य आहेत. एकंदरीत झिपऱ्या एकदा नक्की पहायला आवडेल. समाधान देईल ….
झिपऱ्या ” सुप्रसिद्ध साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू यांची वास्तवाला धरून लिहिलेली – वास्तववादी कादंबरी ,,,, रेल्वे स्टेशन च्या वर ” बूट पोलिश ” करणाऱ्या मुलांचे जीवन व्यथित करणारी, मनाला भिडणारी खरीखुरी संवेदना ” झिपऱ्या ” मधून जाणवते. महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवामध्ये ” झिपऱ्या ” ला पांच नामंकन मिळाली,
अरुण साधू यांचे लिखाण हे मनाला भिडणारे, मानसिकतेला हाथ घालणारे आणि विचार करायला लावणारे आहे,
दिनानाथ घारपुरे

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

<span>%d</span> bloggers like this: