ठाणे येथे तीन हात नाकाला नुकत्याच राबविण्यात आलेल्या ‘डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह’ मोहिमेमध्ये, ऋत्विक केंद्रे, चिन्मय कांबळी, कैलाश वाघमारे, मोनालिसा बागल आणि आयली घिए या सिनेमाच्या कलाकारांनी वाहतूक पोलिसांसोबत ‘डोन्ट ड्रिंक अँड ड्राईव्ह’चा संदेश असलेले ग्रीटींग्स आणि गुलाबाची फुले वाहन चालकांना वाटली. तसेच वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या चालकांना शुभेच्छापत्र देखील दिली.
या मोहिमेला वाहतूक पोलिस आणि रहिवाशांचा देखील भरघोस प्रतिसाद लाभला. दारू पिऊन वाहन चालवल्याने जीवितहानी होण्याची अधिक शक्यता असते तेव्हा वाहन चालवताना ‘ड्राय डे’ पाळा, असा उपदेश सिनेमाचे दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनी लोकांना दिला आहे. आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत हा सिनेमा येत्या 13 जुलैला प्रदर्शित होणार आहे.
Leave a Reply