बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बिग बॉस यांनी सोपवलेले “द ग्रेट डिक्टेटर” हे कार्य सुरु होते. ज्यामध्ये नंदकिशोर हुकुमशाह आणि घरातील इतर सदस्य प्रजा आहेत. परंतु मेघाला बिग बॉस कडून मिळालेल्या आदेशानुसार प्रजेने काल हुकुमशहा विरोधात बंड पुकारला. प्रजा हुकुमशहाच्या किमान पाच पोस्टरवर काळा रंग फासणे, हुकुमशहा यांचा पुतळा नष्ट करणे, हुकुमशहा यांच्या डोक्यावर पाणी ओतणे, हुकुमशहा यांच्यां विशेष रूममध्ये जाऊन स्मोक बॉम्ब फोडणे या बिग बॉस यांनी हुकुमशाही संपुष्टात आणण्यासाठी दिलेल्या कार्यामध्ये यशस्वी ठरली. आणि त्यामुळेच “द ग्रेट डिक्टेटर” या कार्यामध्ये प्रजा विजयी ठरली. आता बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन कोण होणार ? हे बघणे रंजक असणार आहे.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सगळे सदस्य जिंकण्यासाठी आले आहेत. आता थोडे दिवस राहिल्यामुळे घरातील प्रवास आणखीन अवघड होत जाणार आहे. त्यासाठीच ध्येयाच्या आणखीन जवळ नेण्यासाठी बिग बॉस कॅप्टनसीच्या उमेदवारांना “चाल – वाटचाल” हे कॅप्टनसीचे कार्य आज सोपवणार आहेत. ज्यामध्ये रेशम, सई आणि नंदकिशोर हे उमेदवार असणार आहेत. या टास्कमध्ये मेघा आणि रेशम मध्ये वाद होणार आहेत. तसेच सई आणि रेशम मध्ये देखील बरीच बाचाबाची बघायला मिळणार आहे.
Leave a Reply