समाजातल्या अनेक अनिष्ट रूढी –परंपरा, श्रद्धा अंधश्रद्धांचा वेध आजवर चित्रपटांतून घेण्यात आला आहे. मराठी चित्रपटही त्यात मागे नाही. असंख्य मराठी चित्रपटांतून या अपप्रवृत्तींवर कडाडून टिका करण्यात आली आहे. अशाच एका गोष्टीचा वेध घेत, राजकीय नेते आणि समाजव्यवस्थेकडून फसवणूक झालेल्या कुटुंबाची कथा ‘फांदी’ या आगामी मराठी चित्रपटातून आपल्यासमोर येणार आहे. या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच थाटात संपन्न झाला. अजित साबळे दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २० जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘मनोरंजनाच्या माध्यमातून परिणामकारकरीत्या गोष्टी मांडता येतात’. श्रद्धा व अंधश्रद्धेच्या मानवी खेळाचा वेध घेणाऱ्या माझ्या ‘फांदी’ या पहिल्या कलाकृतीचा आशय प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहचेल असा विश्वास व्यक्त करताना या चित्रपटाला सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार दिग्दर्शक अजित साबळे यांनी याप्रसंगी मानले.
Leave a Reply