बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालसुध्दा “होउ दे चर्चा” हे साप्ताहिक कार्य रंगले. ज्यानुसार पुष्कर, आस्ताद, मेघा आणि सई यांनी बऱ्याच ब्रेकिंग न्यूज दिल्या. काल “होउ दे चर्चा” या टास्कमध्ये आऊनी अनिल थत्ते आणि त्यांच्याबद्दल एक ब्रेकिंग न्यूज दिली. तसेच पुष्करने त्याच्या चाहत्यांसाठी एक मनोरंजनाची खास मेजवानी दिली ते म्हणजे एक छान नृत्य. टास्कदरम्यान आस्तादची मेघा आणि सई बरोबर शाब्दिक चकमक झाली. त्या दोघींनी घेतलेला निर्णय आस्तादला पटला नाही आणि त्या विचारसरणीला विरोध दर्शवून त्याने निषेध केला. नंतर मेघा आणि सईने त्यांचा निर्णय बदलून शर्मिष्ठाचे नावं ब्रेकिंग न्यूज मधून काढून आऊ आणि पुष्करचे नावं अंतिम केले. आज पुष्कर आणि आस्ताद मध्ये कॅप्टनसीचे कार्य रंगणार आहे.
कॅप्टनमध्ये किती सहनशीलता आहे यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात हे महत्व अधोरेखित करण्यासाठीच आज बिग बॉस “एक डाव नावाचा” हे कॅप्टनसीचे कार्य सोपवणार आहेत. कॅप्टन या शब्दाचे महत्व अधोरेखित करणे हे या कार्याचे उद्देश आहे. कोण बनणार बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन ? मेघा आणि सईचे भांडण कोणत्या टोकाला जाणार ?
Leave a Reply