आज बिग बॉस सगळ्यांना आगळावेगळा टास्क देणार आहेत. बिग बॉस यांच्या असे निदर्शनास येणार आहे गेल्या अकरा आठवड्यात केलेल्या अथक परिश्रमांमुळे आता सदस्यांना थकवा आला आहे. म्हणूनच सदस्यांना झोपेची नितांत आवश्यकता भासत आहे. यासाठी बिग बॉस मराठीच्या घरातील एक महत्वाचा नियम आज बिग बॉस शिथिल करणार आहेत. बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घरातील सदस्यांना कुठेही आणि कधीही झोपण्यास परवानगी आहे. पण यामध्ये बिग बॉस एक अट घरातील सदस्यांना देणार आहेत. सर्व सदस्यांचा मिळून झोपेचा एकूण अवधी आठ तास असेल.
आता बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य हा टास्क कसा पूर्ण करतील ? कोणती आव्हानं त्यांच्यासमोर येतील ? हे बघणे रंजक असणार आहे
Leave a Reply