बिग बॉस घरातील सदस्यांना नेहेमीच एका पेक्षा एक जबरदस्त सरप्राईझ देत असतात. तसेच एक सरप्राईझ आज घरातील सदस्यांना मिळणार आहे. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका घाडगे & सून मधील सगळ्यांच्या लाडक्या माई म्हणजेच सुकन्या कुलकर्णी मोने आणि वसुधा म्हणजेच अतिशा नाईक जाणार आहेत. सुकन्या आणि अतिशा यांना बघून सगळ्यांनाच खूप आनंद होणार आहे. शर्मिष्ठा सुकन्या ताईना बघून बरीच भावूक झाल्याचे दिसून येणार आहे. या दोघी आतमध्ये गेल्यानंतर बरीच धम्माल मस्ती होणार हे तर नक्कीच. बिग बॉस सदस्यांना एक टास्क देणार आहेत. संसार म्हंटल कि, भांड्याला भांड हे लागणारच. अगदी याप्रमाणेच सासू – सुनांच्या नात्यामध्येही खटके उडणे स्वाभाविक आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये “घरोघरी मातीच्या चुली” या कार्यानिमित्त नात्यातील अशीच एक गंमत बघायला मिळणार आहे. ज्यामध्ये मेघा पुष्करला बरीच अतरंगी कामे देणार आहे जसे स्विमिंग पूलच्या पाण्याने बादली भरणे ज्यासाठी मेघा पुष्करला एक छोटेसे झाकण देणार आहे. तर सईला शर्मिष्ठा आणि नंदकिशोर आस्तादला काही वेगळीच कामे देणार आहेत. आता ही काम घरातील सदस्य कशी पूर्ण करतील हे बघणे रंजक असणार आहे.
Leave a Reply