बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत‘चुंबक’ या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर पीव्हीआर सिनेमा, जुहू येथे प्रदर्शित करण्यात आला. यावेळी प्रख्यात गीतकार, गायक आणि अभिनेता स्वानंद किरकिरे, प्रमुख भूमिकेतील संग्राम देसाई आणि साहिल जाधव, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संदीप मोदी, लेखक सौरभ भावे, चित्रपटाचे निर्माते कायरा कुमार क्रिएशन्सचे नरेन कुमार तसेच केप ऑफ गुड फिल्म्सचे सदस्यही जुहू येथील पीव्हीआर सिनेमा येथे झालेल्या या कार्यक्रमाला उपस्थित होते. ‘चुंबक’ चित्रपटाची प्रस्तुती अक्षय कुमार करत असून निर्मिती अरुणा भाटीया, नरेन कुमार आणि केप ऑफ गुड फिल्म्सनी केली आहे. चित्रपट २७ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
Chumbak Official Movie Trailer Link- http://bit.ly/ChumbakTrailer
Leave a Reply