अनेकदा समाजात स्त्रीला एक भोगवस्तू म्हणूनच पाहिलं जातं. लैंगिक अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण आपल्या देशात दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. या भयाण वास्तवाची जाणीव करूनदेतानाच आपल्या जबाबदारीची जाणीवही करून देणाऱ्या ‘आक्रंदन’ या मराठी चित्रपटाची पहिली झलक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. दिग्दर्शक राजकुमार संतोषी, अल हज हजरत झहीद हुसैन चिश्ती यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते.
उपेंद्र लिमये, शरद पोंक्षे, मिलिंद इनामदार, गणेश यादव, बाळ धुरी यासोबत विक्रम गोखले, स्मिता तळवळकर, अमिता खोपकर, प्रदीप वेलणकर, उदय टिकेकर, भारत गणेशपुरे, तेजश्री प्रधान,विलास उजवणे, पल्लवी वाघ, स्नेहा बिरांजे या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका ‘आक्रंदन’ मध्ये आहेत. चित्रपटाची कथा, दिग्दर्शक शशिकांत देशपांडे यांनी लिहिली असून पटकथा- संवाद शशिकांत देशपांडे व मिलिंद इनामदार यांनी लिहिले आहेत. छायाचित्रण सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर दामोदर नायडू यांनी केलंय. संकलन मनोज सांकला यांचं आहे.
७ सप्टेंबर ला ‘आक्रंदन’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
Leave a Reply