परिक्षण ‘यंग्राड’ – चार युवकांची मनोवेधक कथा

पालक आणि मुलगा यांचे नातेसंबंध कसे असावेत आणि आहेत ह्यावर हा सिनेमा भाष्य करतोपालकांचं लक्ष मुलाकडे किती प्रमाणात आहे ह्यावर सुद्धा सिनेमा भाष्य करतोह्या मुलामुलांचे मित्रमैत्रिणी असतातत्यांच्या किशोर वयात त्यांना वाटते कि आपले भावविश्व म्हणजे आपले मित्रमैत्रिणीचं आहेतमित्रांच्यामध्ये कोणी चुका केल्या तर दुसऱ्या मित्राने त्याला समजावून सांगितलं पाहिजे अर्थात त्याला नीट समज दिली पाहिजेचहि विक्याबाप्पाअंत्यामोन्या ह्या चार मित्रांची कथा आहेत्यांच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आहेत   विक्या ची भूमिका हि चैतन्य देवरे करतो,,  हा विक्या निर्णय घेण्यात पटाईत आहेखूप समजूतदार असून तो निर्णय अचूक घेतो,, बाप्पा ची भूमिका जीवन करळकर करतोय  ह्या मुलाला फक्त खाणं आणि मौज मस्ती करणे इतकेच माहित असतेतसा तो शांत असतो पण तो आपली प्रतिक्रिया लगेच देत नाही. ,, अंत्या ची भूमिका सौरभ पाडवी करतोय   हा अंत्या कोणालाच दुखवत नाहीअंत्याचे वडील हे घाटावर श्राद्ध पक्ष अशी धार्मिक कार्ये करीत असतातह्या कामात अंत्याला रस नसतोत्याला हा वडिलांचा व्यवसाय आवडत नाहीपण त्यांना वाईट वाटू नये म्हणून तो त्यांच्या बरोबर काम करीत असतो.,,, मोन्या ची भूमिका शिवा वाघ करतोय ह्या शिवाला दुनियेची कसलीच फिकीर नसते किंवा तो ह्या गोष्टी चा विचार करीत नाहीतो आपल्याच मस्तीत गुंग असतोतो मित्रांसाठी काही सुद्धा करण्यासाठी तयार असतोअत्यंत धाडसी असा हा मुलगा आहे.

हि सगळीच मुले शाळेत जाणारी आहेतह्या मुलांची मैत्री लहानपणा पासून असते सारेजण घाटावरच्या एका वस्तीमध्ये हे सारे राहत असतात ह्या सिनेमाची कथा हि विक्याच्या भोवती गुंफली आहे.त्याची तेजू नावाची मैत्रीण आहे ती भूमिका शिरीन पाटील हि साकारते आहेहि मुलगी साधी सरळ स्वभावाची आहेशाळा घर आणि मैत्रीण ह्या भोवतीच तिचे आयुष्य असते तिला खोडसाळपणा अजिबात आवडत नाही.   शशांक शेंडे यांनी विक्याच्या वडिलांची भूमिका केली आहे आपल्याकडे मुलगा आणि वडील यांच्या नात्यामध्ये अंतर राखलेलं दिसून येतं आजच्या काळात ते बदललेलं आहे, ” ओ बाबा च्या ठिकाणी ए बाबा ” पर्यंत आलं आहेअसे असलं तरी वडील मुलगा ह्याचं नातं हे घट्ट आहेविक्या आणि त्याचे वडील यांच्यात संवाद नाही पण विसंवाद सुद्धा नाहीतारुण्य सुलभ वयातील मुलगा जसा वागायला हवा त्याप्रमाणे विक्या वागत असतोपण त्याने बालपण हे जपलं पाहिजे त्यांच बरोबर जबाबदारीची जाणीव सुद्धा ठेवायला हवीखरं म्हणजे खोडकरपणावांडपणा आणि गुन्हेगारी ह्या मध्ये एक अंधुकशी रेषा आहे ह्याची जाणीव ठेवायला हवीत्यामुळे खोडकरपणादंगामस्ती करत असताना ती मुले गुन्हेगारी कडे कधी वळतात हे त्याना हि कळत नाहीगुन्हेगारी करून जो आलेला पैसा असतो तो खरं तर आपला नाहीतो दुसऱ्याचा आहेदुसऱ्या कोणाचे सुख आपण ओरबाडून आणतो आहोत हे पालकांनी मुलांना सांगायला पाहिजे. असे संदेश हा सिनेमा कळत न कळत देतो,,,  

        ह्या मुलांच्या आयुष्यात अनेक चढ-उताराचे प्रसंग येतात, प्रत्येक ठिकाणी त्यांना त्या प्रसंगाच्या सामोरे जावेच लागते, एक दिवस असा प्रसंग येतो ती घटना त्यांच्या मैत्रीला yangradआव्हान करणारा असतो, शेवटी त्या चौघांची दोस्ती टिकून राहते कि नाही ह्याचे उत्तर सिनेमात मिळेल,  दिग्दर्शन मकरंद माने यांनी केल असून अनेक काही ठिकाणी पटकथा हि पकड घेत नाही, सिनेमाचे संगीत ठीक आहे, कलाकारांनी आपापल्या भूमिका ठीक साकारल्या आहेत, शशांक शेंडे हे लक्षांत राहतात.

एकाच वस्तीत राहणाऱ्या चार जिवलग मित्रांचे स्वभाव / वृत्ती वेगवेगळे असले तरी ते एकमेकांसाठी काहीही करायला तयार असतात, ह्या मध्यवर्ती कल्पनेवर निर्माते विठ्ठल पाटील, गौतम गुप्ता, गौरव गुप्ता, मधू मंटेंना यांनी त्यांच्या विठ्ठल पाटील प्रॉडक्शन, फ्यूचरवर्क्स मीडिया लिमिटेड, फँटम फिल्म्स या चित्रपट संस्थेतर्फे ” यंग्राड ” ह्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या सिनेमाची कथा-पटकथा-दिगदर्शन मकरंद माने यांचे असून, गीते क्षितीज पटवर्धन, दत्ता पाटील, माघलुब पुनावाला यांची असून हृदय आणि गंगाधर यांनी संगीत दिले आहे. या मध्ये चैत्यन्य देवरे, सौरभ पाडवी, शिव वाघ, जीवन करळकर,शशांक शेंडे, शरद केळकर, सविता प्रभुणे, शिरीन पाटील, मोनिका चौधरी, विठ्ठल पाटील, शंतनू गंगणे, हे कलाकार आहेत,

यंग्राड हा सिनेमा पालक आणि मुले ह्यांच्या नातेसंबंधावर भाष्य करतो.

 

दीनानाथ घारपुरे

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.